Tuesday, July 14, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

बेताल वक्तव्यः किरण दगडे यांच्या दिवाळी किट वाटप कार्यक्रमात एकाची जीभ घसरली, जेष्ठ नेत्यांवर केली अत्यंत खालच्या शब्दांत टीका, आणि म्हणाला “अनंतात” विलीन… काँग्रेसप्रेमींकडून गुन्हा दाखल करण्याची मागणी  

राजकारणात भाषेचा स्तर घसरत चाललाय का? किरण दगडे यांच्या निकटवर्तीयाच्या बेताल विधानांमुळे सर्व स्तरातून निषेध

by SBPRNL
October 6, 2024
बेताल वक्तव्यः किरण दगडे यांच्या दिवाळी किट वाटप कार्यक्रमात एकाची जीभ घसरली, जेष्ठ नेत्यांवर केली अत्यंत खालच्या शब्दांत टीका, आणि म्हणाला “अनंतात” विलीन… काँग्रेसप्रेमींकडून गुन्हा दाखल करण्याची मागणी  

भोरः भाजपचे भोर विधानसभा प्रमुख किरण दगडे यांच्या वतीने भोर, वेल्हा(राजगड) आणि मुळशी तालुक्यातील नागरिकांना दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर किराणा किट वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या जाहीर कार्यक्रमामध्ये किरण दगडे यांचे  निकटवर्तीय गायकडवाड असे नाव असलेल्या व्यक्तीची भाषण करतेवेळी जीभ घरसली आहे. त्यांनी भाषणातून दिग्गज नेत्यांवर खालच्या शब्दांत जहरी टीका केली आहे. यामुळे काँग्रेसच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला असून, अनेकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसेच या प्रकरणी तालुक्यातील काँग्रेसप्रेमींकडून पोलीस स्टेशनला संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करणाऱ्या पत्र पोलीस स्टेशनला देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

नेमकं काय म्हणाली ती निकटवर्तीय व्यक्ती

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

राजकारणात आरोप प्रत्यारोप वा हेवेदावे होतच असतात. परंतु अनेकदा राजकरणात भाषेचा स्तर घसरला असल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. किरण दगडे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात अशीच एक घटना घडली आहे. यामध्ये त्यांचे निकटवर्तीयांनी मा. मंत्री अनंतराव थोपटे, तालुक्याचे आमदार संग्राम थोपटे आणि मा. मंत्री अनंतराव थोपटे यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली आहे.

एक संग्राम, दुसरा पृथ्वीराज आणि तिसरा अनंतरावः निकटवर्तीयांचे विधान

हा पृथ्वाराज राज्य करायला निघाला आहे, याने पहिल्यांदा तालुक्यात राज्य करून दाखवावे यानंतर पृथ्वीचा विचार करावा.

संग्राम आधी युद्ध जिंकाव लागतं, त्यानंतर घोडा सोडावा लागतो, जो आडवेल त्याच्याबरोबर युद्ध करावं लागतं, यामध्ये जो विजयी होईल त्यालाच संग्राम म्हटलं जातं. हा कुठे गेला होता युद्ध करायला अशी जहरी टीका या निकटवर्तीयांने आमदार संग्राम थोपटेंवर केली आहे.

तसेच भोर तालुक्यातील सत्तर आणि त्यानंतरच्या काळात ज्या व्यक्तीने मंत्री पद भूषविले. भोर तालुक्याला वेगळी ओळख निर्माण करून दिली. तब्बल ६ वेळा या मतदार संघाचे नेतृत्व विधानसभेत केले. अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी सतत पाठपुरावा केला. शिक्षणसंस्थानच्या मार्फत शिक्षण देण्याचे पवित्र कामे मा. मंत्री अनंतराव थोपटे यांच्याविषयी देखील या निकटवर्तीयाने अत्यंत खालच्या शब्दांत टीका केली. त्यांच्याविषयी बेताल वक्तव्य केले. त्यांच्या वयाचा मान राखता त्यांचा राजकारणात गाढा अनुभव पाहता त्यांना “अनंतात विलीन करा” असे म्हणणे योग्य नाही.

या बेताल विधानांचे तीव्र स्वरुपाचे पडसाद तालुक्यात उमटले असून सर्व स्तरावरून या गोष्टीचा निषेध नोंदविण्यात येत आहे. या विषयी तालुक्याचे आमदार संग्राम थोपटे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या गोष्टीचा निषेध व्यक्त केला आहे. राजकारणात इतक्या खालच्या स्तरावर जाऊन टीका करणे योग्य नसल्याचे थोपटे यांनी सांगितले.

किरण दगडे यांनी केली दिलगिरी व्यक्त

किरण दगडे यांनी केलेल्या आयोजित कार्यक्रमात झालेल्या प्रकाराबद्दल त्यांनी जाहीर सभेमध्ये दिलगिरी व्यक्त केली.

Tags: anatraothopateBhorkirandagadepruthvirajchavanrajgadnewssangramthopate
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post
भोरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विजयादशमीचे संचलन उत्साहात संपन्न; २७३ स्वयंसेवक सहभागी, ठिकठिकाणी रांगोळी, पुष्पवृष्टी आणि आतिषबाजी

भोरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विजयादशमीचे संचलन उत्साहात संपन्न; २७३ स्वयंसेवक सहभागी, ठिकठिकाणी रांगोळी, पुष्पवृष्टी आणि आतिषबाजी

ताज्या बातम्या

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

July 8, 2026
शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

July 4, 2026
भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

July 3, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group