सासवडः प्रतिनिधी बापू मुळीक
७ सप्टेंबर हा बँक ऑफ इंडियाचा (bank of india) ११९ वा वर्धापन दिवस नुकताच सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागांंतील बँकेच्या पिसर्वे शाखेने गावातील अंगणवाडीतील चिमुकल्यांच्या हस्ते केक कापून हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला. रंगीबेरंगी फुगे, विद्युत रोषणाई, छोट्या मुलांना खाऊ वाटप व उपस्थित ग्राहकांना मिठाई वाटून वर्धापन दिन साजरा करण्यात आला. तसेच या उपक्रमाचे अनेकांनी कौतुक केले.
यावेळी बँकेचे शाखाधिकारी सचिन दोलताडे, भुषण चौधरी, बासुदेव नायक, राजेश काळे, रुपेश वाघमारे या कर्मचाऱ्यांसह निलेश बनकर, निवृत्ती कोलते, झुबेदा शेख, तुषार कोलते , सुशीला गोळे, कुणाल कोलते व अन्य ग्राहक यावेळी उपस्थित होते. अंगणवाडीच्या वंदना प्रताप वाघमारे, सुनंदा राहुल कोलते व मंगल मोहन खोपडे यांनी उपक्रमात सहभाग नोंदवला होता. शाखा व्यवस्थापक सचिन दोलताडे यांनी सर्वांचे स्वागत केले.