वर्गात ७० विद्यार्थ्यांची हजेरी, जुन्या आठवणींना उजाळा
भोर तालुक्यातील आंबवडे (ता.भोर) येथील श्री नागेश्वर विद्यालयातील सन २००५-०६ सालच्या दहावीच्या तुकडी अ आणि ब मधील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा रविवार (दि.११) रोजी संपन्न झाला. या मेळाव्यात ७० विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला.
स्नेह मेळाव्याची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली. हजेरी घेतल्यानंतर झालेल्या ओळख परेड मध्ये प्रत्येकाने आपले कुटुंब व सध्या कार्यरत असलेल्या कामधंदा याविषयी माहिती सांगितली. उपस्थित शिक्षकांचा शाल,श्रीफळ व सरस्वती देवीची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कोमल बागल, अश्विनी कोंढाळकर, दिपाली तांबे, निलेश साबळे, नागेश तामकर आदी माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून दहावीतील मित्र मैत्रिणी व शिक्षकांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी सर्वजण जुन्या आठवणींनी भाऊक झाले होते.
स्नेहमेळाव्याचे नियोजन विक्रम खोपडे, सचिन खोपडे, प्रतिक वाळंजकर, वैशाली देवघरे, निलेश देवघरे, जितेंद्र भडाळे यांनी केले. मुख्याध्यापक सुनिल थोपटे यांचेसह आर आर पाटील, डि के पाटील, जी एम जाधव, संतोष घोरपडे, पी एस कुंभार सुनिल जेधे आदी शिक्षक तसेच रवींद्र खोपडे, केतन खोपडे, रोहन खोपडे, अवि खोपडे, विजय तांबे, विठ्ठल साळंके, रमेश कोंढाळकर, प्रसाद महामुलकर,सचिन खोपेडे, सागर भडाळे, दिपक चिकणे, भाग्यश्री खोपडे, अश्विनी खोपडे आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते. सुत्रसंचलन भाग्येश्री खोपडे तर आभार मनोज खोपडे यांनी मानले. लवकरच पुन्हा भेटण्याच्या संकल्पना मांडून स्नेहमेळाव्याची सांगता करण्यात आली.