Wednesday, June 24, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Bhor – भोर शहरात दिवसाढवळ्या एकाच दिवशी दोन घरफोड्या; रोख रक्कमेसह साडेतीन लाखांचा ऐवज लंपास

by कुंदन झांजले
June 15, 2025

पुन्हा एकदा भरदिवसा शहरातील घरफोडीने  नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

मागील काही महिन्यात भोर शहरात चोरीचे प्रमाण वाढले आहे. अशातच भर दिवसा पुन्हा भोर शहरात चोरट्यांनी घरफोडी करून ३ लाख ६० हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. ही घटना शुक्रवार दि.१३ सकाळी ९ ते सायंकाळी ६ च्या दरम्यान संजयनगर येथील श्री स्वामी समर्थ नगरजवळ असलेल्या घरात घडली. याबाब घरमालक श्रीकांत लक्ष्मणराव भातलवंडे (वय ५०) यांनी भोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

     पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार श्रीकांत भातलवंडे व त्यांच्या पत्नी सकाळी घराला कुलूप लावून कामावर गेले होते. सायंकाळी कामावरून आल्यावर चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. चोरट्याने घराचा कोयंडा तोडून घरात प्रवेश केला व घरातील कपाटात ठेवलेले २ लाख ८० हजार किमतीचे सोन्याचे दोन डोर्ले व दोन साखळ्या असलेले गंठण, ८० हजार रुपये किमतीच्या सोन्याची दोन डोर्ले व १० सोन्याचे मनी असलेली पोत असे ३ लाख ६० हजाराच्या किमतीचे दागिने चोरले. याबाबत गुन्ह्याची नोंद केली असून पोलिस निरीक्षक अण्णा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत असल्याचे ठाणे अंमलदार डी. डी. खांडे यांनी सांगितले.

एकाच दिवशी दोन घरफोड्या 

       संजय नगर तसेच शिक्षक सोसायटी (विष्णू कृपा) येथे एकाच दिवशी घरफोड्या झाल्या. संजयनगरमधील घरफोडीत ३ लाख ६० हजारांचे दागिने चोरीला गेले.तर शिक्षक सोसायटीतील घरफोडीत दागिने अथवा रोकड नसल्याने शोधाशोध करूनही चोरट्यांच्या हाताला काही लागले नाही.दुसऱ्या घरफोडीबाबत पोलिस ठाण्यात नोंद केली नाही. भरदिवसा शहरात झालेल्या या चोरींच्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे

Tags: Bhor
कुंदन झांजले

कुंदन झांजले

पत्रकारिता क्षेत्रात गत ७ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह दै पुण्यनगरी मध्ये प्रतिनिधी म्हणून गत सहा वर्षांपासून काम करीत असून गेल्या तीन वर्षांपासून "राजगड न्यूज" मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post

भोर - कापुरव्होळ रस्त्यावर भाटघर जवळ रस्त्याची दुरावस्था; दुचाकी वाहनांची घसरगुंडी

ताज्या बातम्या

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

June 23, 2026
सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

June 23, 2026
भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

June 22, 2026
पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

June 21, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group