Tuesday, July 21, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

हरकतः स्थावर मालमत्तेच्या माहितीत तफावत; संग्राम थोपटे यांचा उमेदवारी अर्ज रद्द करावा? अपक्ष उमेदवार भाऊ मरगळे यांनी दाखल केला हरकत अर्ज तर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अर्ज फेटाळला

संग्राम थोपटे यांनी दिले स्पष्टीकरण, नेमकं काय म्हणाले थोपटे?

by SBPRNL
October 30, 2024
हरकतः स्थावर मालमत्तेच्या माहितीत तफावत; संग्राम थोपटे यांचा उमेदवारी अर्ज रद्द करावा? अपक्ष उमेदवार भाऊ मरगळे यांनी दाखल केला हरकत अर्ज तर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अर्ज फेटाळला

भोरः  राज्यातील २८८ विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची दि. २९ अॅाक्टोबर ही शेवटची तारीख होती, तर आलेल्या अर्जांची छाननी आज दि. ३० अॅाक्टोबर रोजी पार पडली आहे. या अर्जांची छाननीच्या प्रक्रियेबाबत भोर विधानसभा मतदार संघात प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात पार पडली. यावेळी  अर्जदार भाऊ पांडुरंग मरगळे यांनी संग्राम अनंतराव थोपटे यांच्या नामनिर्देशन अर्जावर लेखी हरकत तक्रार दाखल केली होती. मात्र, अपक्ष उमेदवाराचा हरकत अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांनी फेटाळून लगावला आहे. यामुळे स्थावर मालमत्तेच्या माहितीत तफावत असल्याची हरकत घेण्यात आली होती.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

त्यामुळे हरकत फेटाळून लगावली

या हरकत तक्रारी अर्जात  संग्राम थोपटे यांनी मुलाची संपत्ती लपवली असून आंबेघर (ता.भोर) येथील खडी मशीन बाबतची माहिती दिलेली नाही. तसेच अर्जात खोटी व अर्धवट माहिती सादर केली आहे, असे म्हटले आहे. यामुळे माहिती लपवल्या प्रकरणी उमेदवारी अर्ज रद्द करावा, असे या हरकतीवर नमूद करण्यात आले होते. यावर संग्राम थोपटे यांचे अधिकृत प्रतिनिधी अशोक विठ्ठल थोपटे यांनी लेखी म्हणणे सादर करीत पृथ्वीराज संग्राम थोपटे यांची मिळकत आंबेघर (ता.भोर) खडीमशीन व्यवसाय स्वतंत्र आहे. त्यामुळे संग्राम थोपटे यांच्या प्रतिज्ञा पत्रावर तसे लिहिणे बंधनकारक नाही. त्यामुळे ज्यांनी हरकत घेतली आहे त्यामध्ये तथ्य नाही त्यांचा अर्ज पात्र ठरविण्यात यावा असे अशोक थोपटे यांनी लेखी निवदेनात सांगितले असल्याची माहिती मिळत आहे.

यावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरत देत यामध्ये सदर प्रतिज्ञापत्रात संबंधित उमेदवाराने लपवलेली माहिती त्याची तपासणी करणे वा शहानिशा करणे हे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अधिकार किंवा कार्यक्षेत्रात येत नाही. संग्राम थोपटे यांनी नामनिर्देशन पत्रासोबत प्रतिज्ञा पत्रातील सर्व रकाने भरलेले आहेत. या कारणावरून हरकत तक्रारी अर्ज फेटाळले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी डॅा. विकास खरात यांनी सांगितले. तसेच आवश्यक असल्यास त्यांनी कार्यालयात शपथपत्र सादर करावे असे आदेश देत म्हटले आहे.

मी भरलेला अर्ज निवडणूक आयोगाने ग्राह्य धरलेला आहेः संग्राम थोपटे 

अर्ज दाखल करताना तुमच्यावर अवलंबून असणाऱ्या घटकांबद्दल तुम्हाला माहिती द्यावी लागते. त्यानुसार माझ्यावर अवलंबून असणाऱ्या घटकांची माहिती मी माझ्या फार्ममध्ये दिलेली आहे. माझा मुलगा हा सज्ञान आहे, त्याचे वय १८ पेक्षा अधिक आहे. त्याचा स्वतंत्र व्यवसाय असल्यामुळे त्याची माहिती देण्याची मला गरज नव्हती. यावर त्यांनी हरकत घेतली आणि सांंगितले ही माहिती दिली नाही. मी भरलेला अर्ज योग्य असल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी तो ग्राह्य धरलेला आहे.

Tags: Bhormlasangramthopaterajgadnews
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post
भोरः सेनापती येसाजी कंक यांच्या स्मारकास संग्राम थोपटे यांनी केले अभिवादन; भाटघर धरण भागातील गावांना भेट, नागरिकांशी साधला संवाद

भोरः सेनापती येसाजी कंक यांच्या स्मारकास संग्राम थोपटे यांनी केले अभिवादन; भाटघर धरण भागातील गावांना भेट, नागरिकांशी साधला संवाद

ताज्या बातम्या

पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत

पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत

July 20, 2026
भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

July 8, 2026
शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

July 4, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group