Thursday, June 4, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

……आता माघार नाही ! कुलदीप कोंडे निवडणुकीच्या रणांगणात दाखल, भव्य सभेच्या माध्यमातून करणार प्रचाराचा शुभारंभ, चौरंगी लढतीकडे सर्वांचे लक्ष

by Team Rajgad Publication
November 4, 2024
……आता माघार नाही ! कुलदीप कोंडे निवडणुकीच्या रणांगणात दाखल, भव्य सभेच्या माध्यमातून करणार प्रचाराचा शुभारंभ, चौरंगी लढतीकडे सर्वांचे लक्ष

भोरः विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघार घेण्याची आज दि. ४ नोव्हेंबर शेवटची तारीख आहे. मागचे ४ ते ५ दिवस हे दिवाळीचे असल्याने सर्वजण दिवाळीच्या सणात व्यग्र होते. याच काळात पक्षातील नाराजांची मनधरणी करण्याचे परफेक्ट टाईम मिळाले. बंडोबांना धंडोबा करण्यात काही अंशी पक्षातील बड्या नेत्यांना यश आले असले तरी अद्यापर्यंत अनेकजण निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत. भोर विधानसभेसाठी मागच्या दोन निवडणुकीत विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांना शिवसेनेचे कुलदीप कोंढे यांनी लढत दिली होती. या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून (शिंदे) कोंडे यांनाच उमेदवारी मिळेल अशी शक्यता होती. मात्र, ऐनवेळी दुसऱ्या पक्षातून आयत केलेल्या उमेदवाराला युतीकडून संधी देण्यात आली. यामुळे कोंडे हे नाराज होते. त्यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेत उमेदवारी अर्ज दाखल केला. ५ नोव्हेंबरला भोरमध्ये त्यांची विराट सभा पार पडणार आहे, यासाठी मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात येत आहे. कुलदीप कोंडे हे या सभेत काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

आज दि. ४ नोव्हेंबर उमदेवारी अर्ज माघार घेण्याची शेवटची तारीख आहे, मात्र कुलदीप कोंडे अपक्ष निवडणूक लढविण्यावर ठाम असून कोणत्याही परिस्थितीमध्ये अर्ज माघार घेणार नसल्याचे कुलदीप कोंडे युवा मंचच्या वतीने सांगण्यात आले आहे. भोर शहरातील राजा रघुनाथराव विद्यालयाच्या प्रांगणावर ५ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास भव्य विराट सभा पार पडणार आहे. या सभेसाठी मोठ्या प्रमाणावर तयारी करण्यात येत असून, २० हजार नागरिकांच्या दृष्टीने सभेच्या ठिकाणी सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. कुलदीप कोंडे युवा मंचाच्या पदाधिकाऱ्यांकडून या सभेच्या माहितीसाठी वाड्या वस्त्यांवर घोंगडी बैठका घेतल्या जात आहे. कोंडे यांच्या समर्थकांकडून सभेसाठी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. याबाबतची माहिती कुलदीप कोंडे युवा मंचाचे पदाधिकारी विकास बाप्पू चव्हाण यांनी दिली.

You might also like

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

थोपटेंच्या दौऱ्याला सुरूवात, कोंडे यांची भव्य सभा 

आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे हे चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. गेले ३ टर्म संग्राम थोपटे या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. त्यांनी प्रचार दौऱ्याला सुरूवात केली असून भोर, वेल्हा आणि मुळशी भागातील गावांना भेट देत नागरिकांशी संवाद साधत आहेत. त्यांच्या या दौऱ्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. कुलदीप कोंडे यांची भव्य विराट सभा ५ नोव्हेंबर या दिवशी होत असून, या सभेच्या माध्यमातून कोंडे आपल्या प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत. मात्र, ते या सभेत नेमके काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

चौरंगी लढत, दोन अपक्ष

भोर विधानसभेच्या निवडणुकीच्या रणांगणात युतीमधून इच्छुकांची भाऊगर्दी मोठी होती. किरण दगडे यांनी निवडणूक लढण्याचा निर्धार करीत त्यादृष्टीने तयारीला सुरूवात केली होती. मग त्यामध्ये यात्रा, आरोग्य शिबीर, विविध प्रकाराचे कार्यक्रम दगडे यांच्या वतीने घेण्यात आले होते. कुलदीप कोंडे यांचे पारडे जड असतानाच राष्ट्रवादी(अजित पवार) पक्षाकडून शंकर मांडेकर यांना उमेदवारी मिळाली. कोंडे हे युतीचे अधिकृत उमेदवाराचे दावेदार होते. मात्र त्यांचा पत्ता कट करून मांडेकर यांना संधी देण्यात आली. यामुळे कोंडे आणि दगडे हे नाराज झाले. त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून, सध्याच्या परिस्थितीमध्ये  कुलदीप कोंडे, संग्राम थोपटे, शंकर मांडेकर, किरण दगडे अशी चौरंगी लढत होणार आहे. या लढतीकडे आता भोर, वेल्हा(राजगड) आणि मुळशीतील नागरिकांचे लक्ष लागलेले आहे.

Tags: BhorkuldeepkondheMulshirajgadnewsVelha
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
ताज्या बातम्या

Bhor – भोर वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर साष्टांग प्रणाम आंदोलन; लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे

August 13, 2025
ताज्या बातम्या

Bhor- रास्ता रोको आंदोलन !! भोरला रस्त्यांसाठी शाळकरी विद्यार्थ्यांचा एल्गार  ; भोर- कापूरव्होळ रस्त्यांची दयनीय अवस्था ; शाळेच्या विद्यार्थ्यांसह भोलावडे पंचक्रोशीतील नागरिकांचे रास्ता रोको आंदोलन

August 5, 2025
Koyata Gang भरदिवसा सरपंचाच्या पतीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; हल्ल्याचा ‘मुख्य आका’ कोण?
क्राईम

Koyata Gang भरदिवसा सरपंचाच्या पतीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; हल्ल्याचा ‘मुख्य आका’ कोण?

August 2, 2025
Next Post
उपक्रमः चहाच्या दुकानात थाटलाय पुस्तकांचा स्टॅाल; दिवाळीत फटाके नको, पुस्तके हवीत… नाविण्यपूर्ण उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

उपक्रमः चहाच्या दुकानात थाटलाय पुस्तकांचा स्टॅाल; दिवाळीत फटाके नको, पुस्तके हवीत... नाविण्यपूर्ण उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

ताज्या बातम्या

Breking News: गर्भलिंग निदान प्रकरणात किकवीच्या डॉ. मंदार माळी यांच्यावर गुन्हा दाखल,पोलिसांकडून शोध सुरू

Breking News: गर्भलिंग निदान प्रकरणात किकवीच्या डॉ. मंदार माळी यांच्यावर गुन्हा दाखल,पोलिसांकडून शोध सुरू

May 30, 2026
न्हावी परिसरात कॉपर केबल चोरी; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

न्हावी परिसरात कॉपर केबल चोरी; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

May 26, 2026
“महामार्ग पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद” – आमदार भीमराव तापकीर

“महामार्ग पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद” – आमदार भीमराव तापकीर

May 26, 2026
राजगड तालुक्यात मध्यरात्री गोळीबार; दोघे जखमी, जिल्ह्यात नाकाबंदी

राजगड तालुक्यात मध्यरात्री गोळीबार; दोघे जखमी, जिल्ह्यात नाकाबंदी

May 25, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

RajgadNews.Live हे महाराष्ट्रातील एक अग्रगण्य स्थानिक मराठी न्यूज पोर्टल आहे. आमचे मुख्य उद्दिष्ट जगभरातील आमच्या वाचकांसाठी ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आणि महत्त्वपूर्ण माहिती अचूकपणे आणि थेट मराठीत पोहोचवणे हे आहे. राजकीय, सामाजिक, क्रीडा असो वा स्थानिक घडामोडी, महाराष्ट्रातील प्रत्येक कानाकोपऱ्यातील बातमी आम्ही तुमच्यापर्यंत प्रामाणिकपणे पोहोचवतो.

Follow Us

Copyright © 2026. Rajgad News.live

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. Rajgad News.live

WhatsApp us