भोर : पुणे-सातारा महामार्गावरील सारोळा गावच्या हद्दीत मालवाहू ट्रक आणि ट्रॅक्टर यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रॅक्टर चालक गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे सातारा महामार्गावरील सारोळा गावच्या हद्दीत पुण्यावरून सातारा कडे माल वाहून नेणारे ट्रक (एम एच ०४ के यु ५७८०) यावरील वाहनधारकांची वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हायवे वरून जात असलेल्या दुसरे वाहन ट्रॅक्टर याला मागील बाजू धडक दिल्याने ट्रॅक्टर हा सर्विस रोडवर जाऊन पलटी झाला या पलटी झालेल्या ट्रॅक्टर खाली दुचाकी येऊन त्याचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले तर ट्रॅक्टर वरील वाहन धारक जखमी झाला असून उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.अपघाताची तीव्रता इतकी होती की मालवाहू ट्रकने ट्रॅक्टरला मागील बाजूने जोरदार धडक दिली. यामुळे ट्रॅक्टरसह त्यावर ठेवलेली शेतीची अवजारे सर्विस रोडवर पलटली. या घटनेत सर्विस रोडवर उभी असलेली काही दुचाकी वाहने पूर्णपणे चिरडली गेली आणि मोठे नुकसान झाले आहे. ते ट्रक देखील जागीच पलटी झाला. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी पहायला मिळाली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि वाहतूक सुरळीत केली.
दैव बलवत्तर म्हणून वाचला दुचाकीस्वार
अपघात ठिकाणी दृष पाहिल्यानंतर सर्वांच्याच हृदयाचा ठोका चुकला दुचाकीची झालेली अवस्था पाहून जीवित हानी झाली असेल अशी चर्चा मात्र रंगू लागली परंतु दुचाकी स्वरणे पावसा पासून वाचण्यासाठी दुचाकी ही सर्विस रोड लगत लाऊन तेथून जवळच असलेल्या शेड झाली गेला आणि हा अपघात घडला.”दैव बलवत्तर म्हणून वाचला जीव” हे मात्र त्या मुलाला पाहून सर्व नागरिक बोलू लागले.