भोरः माजी आमदार भीमराव तापकीर व मा. जीवन कोंडे भोर तालुका अध्यक्ष भाजपा व पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य
यांच्या प्रयत्नातून रांजे गावामध्ये विकास कामे मंजूर करण्यात आली आहेत. यामध्ये रस्त्यांच्या कामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी देण्यात आला आहे. यामुळे त्यांचे येथील नागरिकांनी आभार मानले.
देसाई कंपनी ते राहाटवडे गाव ३ किमीच्या रस्ता काँक्रिटीकरणासाठी 6.50 कोटी रुपयाचा निधी, आर्वी फाटा सिंहगड हॉटेल ते रांजेगाव रस्ता काँक्रिटीकरणासाठी 2.65 कोटी रुपयांचा निधी, नाना गुजर यांच्या घरापासून ते नितीन पिसाळ यांच्या पोल्ट्रीपर्यंत काळुबाई रस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी 15 लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
या कार्यक्रमासाठी उपस्थित नाथासाहेब साबळे, अभिजीत कोंडे उपाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा पुणे जिल्हा, मयूर कोंडे ग्रामपंचायत सदस्य, संदीप दादा गुजर, समीर कोंडे, सागर तावरे, अविनाश शेठ साबळे, महेश जायकर, नितीन पायगुडे, पंकज पिसाळ व समस्थ ग्रामस्थ रांजे उपस्थित होते.