पुणेः पुणे स्टेशन परिसरातील विल्सन गार्डन परिसरात असलेल्या जनरल स्टोअरच्या दुकानाला शुक्रवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास आग लागली असल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती अग्नीशमल विभागाला मिळताच अग्नीशमल दलाचे दोन बंब आणि दोन टँकर घटनास्थळी दाखल होवून त्यांनी आग आटोक्यात आणली. दुकानाच्यावर असलेल्या लॉजमधील प्रवाशांची जवानांनी सुखरुप सुटका केली आहे.
सदर घटना नागरिकांच्या निदर्शनास आणल्याने त्यांनी तातडीने याची माहिती अग्नीशमल विभागाला कळवली. त्यानंतर तत्काळ त्या ठिकाणी अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख विजय भिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली. या आगीत दुकानतील साहित्य जळाले असल्याची माहिती आहे. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. आगीमागचे नेमके कारण समजू शकलेले नाही. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती मिळत आहे.