Thursday, June 4, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

विधानसभा : कोण होणार भोरचा आमदार? थोपटेंच्या साम्राज्यात, महायुतीचा कस लागणार आणि विधानसभेच्या तिकीटावर कोण निवडून येणार?

भोरला नेत्यांच्या गावभेट दौ-याने विधानसभा मतदारसंघात आमदार इच्छुकांची रस्सीखेच तर विविध साहित्य वाटपात नागरिकांची चंगळ

by कुंदन झांजले
October 3, 2024

भोर:  हळूहळू विधानसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. नूकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत सुप्रिया सुळे व सुनेत्रा पवार यांच्या लढतीत सुप्रिया सुळे यांनी विजय साकारत बाजी मारली तर सुनेत्रा पवार यांचा पराभव अजित पवार यांच्या जिव्हारी लागला असे बोलले जात आहे. भोर मधुन विजयी मताधिक्य देत विद्यमान आमदार संग्राम थोपटे हे या निवडणुकीत विजयाचे किंगमेकर ठरल्याने पुन्हा आमदार थोपटेंचे वर्चस्व निर्माण झाल्याचे चित्र आहे.

काही दिवसात विधानसभेची आचारसंहिता लागणार आहे. त्यामुळे भोर वेल्हा मुळशी या विधानसभा मतदार संघात  इच्छुक उमेदवारांनी जनसंपर्क वाढविण्यास सुरूवात केली आहे. इच्छुक उमेदवारांचे गावभेट दौरे, जनसंवाद यात्रा , विविध विकास कामे कार्यक्रम पुस्तिका, सोशल मीडियावरील व्हिडिओ, रिल्स सुरू झाले आहेत. तर इच्छुकांनी विविध उपक्रमातून साहित्य वाटपाने तालुक्यातील नागरिकांचा चांगला फायदा होताना दिसत आहे.

You might also like

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

इच्छुक उमेदवारांची आमदारासाठी रस्सीखेच

महाविकास आघाडीत कॉंग्रेसचे विद्यमान आमदार संग्राम थोपटे असुन ,शिवसेना उ बा ठा गटाकडुन मुळशीतुन शंकर मांडेकर यांनी रस्त्यालगत सर्वत्र भावी आमदार असे फ्लेक्स लावून व रायरेश्वरावचे दर्शन घेऊन शिवसंवाद,जनसंवाद यात्रेतुन आपण इच्छुक आहे असे सांगितले आहे. महायुतीतुन भाजपाकडून माजी नगरसेवक किरण दगडेपाटील,तालुका अध्यक्ष जीवन कोंडे, शिवसेना शिंदे गटाकडून भोरमधुन कुलदीप कोंडे, शिवसेना शिंदे गटाकडून मुळशीतुन बाळासाहेब चांदोरे, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून माजी पुणे जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित शिवतरे, माजी जि.प सदस्य विक्रम खुटवड अशी इच्छुक उमेदवारांची आमदारासाठी रस्सीखेच होणार आहे.

तर जनसेवक भाजपचे तालुका उपाध्यक्ष समीर घोडेकर यांनीही दहा दिवसांचे उपोषण करत आपणही कोठेही इच्छुकात कमी नसल्याचे दाखवून दिले आहे.त्यामुळे सलग तीन वेळा निवडून आलेले मंत्री पदाचे दावेदार विद्यमान आमदार संग्राम थोपटेंच्या साम्राज्यात जास्त उमेदवाराचा फायदा थोपटेंना बसणार की यावेळी जनता चित्र पालटणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

यावेळी जागा वाटपात कोणता पक्ष कोणती उमेदवारी मागतोय व हि उमेदवारी कोणाला मिळतेय याकडे सर्वांचे लक्ष आहे. महाविकास आघाडीत बिघाडी झाली नाही तर जरी मुळशीतुन शंकर मांडेकर हे जरी इच्छुक असले तरी मात्र लोकसभेला विजयाचे शिल्पकार ठरलेले कॉंग्रेसचे संग्राम थोपटे हेच उमेदवार असणार आहेत असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे. महायुतीत मात्र या मतदारसंघात जास्त इच्छुक उमेदवार आहेत. त्यामुळे जागा वाटपावरून या मतदारसंघात मोठा गोंधळ होणार असल्याचे चित्र आहे. भाजपच्या किरण दगडे यांनी लोकांच्या तीर्थ यात्रा, गावातुन सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचा धडाका, गाव भेट दौरे, संवाद यात्रा, आरोग्य शिबीरे, लोकांना आर्थिक मदतीचा हात सुरू केला आहे त्यामुळे तेच भाजपचे प्रमुख दावेदार ते मानले जात आहेत. त्यांना तसा शब्द दिल्याने भोरच्या जनमानसात त्यांचीच मात्र मोठी चर्चा आहे‌.

जीवन कोंडे यांनीही आपणही कोठे कमी पडत नसल्याने इच्छा व्यक्त केल्याचे लोकांकडून सांगितले आहे. तसेच  लोकसभेला ऐन मोक्याच्या वेळी ठाकरे गटातुन शिंदे गटात गेलेले कुलदीप कोंडे यांनीही गतवर्षीप्रमाणे आपल्यालाच तिकीट मिळणार असल्याचे म्हणत काम सुरू केले आहे. मुळशीतुनही शिवसेनेच्या शिंदे गटातुन बाळासाहेब चांदोरे यांनीही आपल्या विकासकामाची गाथा पुस्तिका गावोगावी ,वाडी- वस्त्यांवर पोहचवत यावेळी आपण उमेदवार असल्याचे सांगितले आहे.

राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे नेहमीच चर्चेत राहिलेले रणजित शिवतरे मात्र यावेळेस चंग बांधून मैदानात उतरणार आहे. त्यांच्या गावभेट दौरा व जनसंवाद दौ-यातुन विकास कामे मंजूरी यातून सिध्द झाले आहे. रणजित शिवतरे व संग्राम थोपटे अशी दुरंगी लढत झाली तर मात्र अनेकांच्या भुवया उंचावणार आहेत.  तसेच अ प राष्ट्रवादीचे जेष्ठ चंद्रकांत बाठे, माजी आमदार स्व. काशिनाथ खुटवड यांचे सुपुत्र विक्रम खुटवड हेही इच्छुकांमध्ये असणार आहेत असे जनमानसात बोलले जात आहे.

भाजपचे समीर घोडेकर यांनीही थोपटेंविरोधात उपोषण करून एक जनसेवक इच्छुक असल्याचे सांगितले आहे .यावेळी लोकसभेचा पराभव जिव्हारी लागल्याने अजित पवार हे संग्राम थोपटेंना पाडण्यासाठी नवा डावपेच आखत नवी खेळी करणार हे त्यांच्या बोलण्यातून जाणवत दिसत आहे. महायुतीत जागा वाटपात या मतदारसंघात जास्त इच्छुक उमेदवार असल्याने मोठी बंडखोरी होणार हे स्पष्ट दिसत आहे.

निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या विश्वासावर विजयासाठी  संग्राम थोपटे सज्ज

तीनही तालुक्यात विकासकामांचा धडाका सुरू ठेवत आपल्या कुटुंबा समवेत निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या विश्वासावर विजयासाठी  संग्राम थोपटे सज्ज आहेत. जर दुरंगी लढत झाली तर थोपटेंचा कसं लागणार पण चौरंगी ,पाच सहा उमेदवारात लढतीत पुन्हा थोपटेच विजयाचा चौकार मारणार असे जाणकारांच्या मते असे सांगण्यात आले आहे. कारण सन २००९ ला तिरंगी लढतीत १८५८० ,२०१४ ला चौरंगी लढतीत १८९५१ तर २०१९ ला दुरंगी लढतीत मात्र ९२०६ मतांनी संग्राम थोपटे निसटते विजयी झाले होते. 

सोशल मीडियावर मात्र….

सोशल मीडियावर मात्र भोरची एमआयडीसी , बेरोजगारी, रस्त्यांची दुरवस्था, वीजेचा खोळंबा, आरोग्य समस्या, खड्डेमय-जलमय भोरचे निकृष्ट बसस्थानक, तरुणांचा बाहेरगावी कामासाठी जाणारा लोंढा ,वाढणारी गुन्हेगारी, अवैध धंदे, विस्कळित वाहतूक व्यवस्था, शहरातील पाणी समस्या, बंद पडत असलेले उद्योग धंदे यांचे सोशल मीडियावरील विद्यमान आमदार खासदारां विरोधातील व्हिडिओ, बॅनर, रिल्स बनत असल्याने तरूणांचे हे सोशलवॉर या मतदार संघात कोणाच्या पथ्यावर पडणार ? कोणाला फायदा होणार ? कोण फायदा घेणार? कोण होणार भोरचा आमदार? महायुती की महाविकास आघाडी ?याचे चित्र आगामी निवडणुकीत स्पष्ट होणार आहे हे दिसत आहे.

 

Tags: Bhor
कुंदन झांजले

कुंदन झांजले

पत्रकारिता क्षेत्रात गत ७ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह दै पुण्यनगरी मध्ये प्रतिनिधी म्हणून गत सहा वर्षांपासून काम करीत असून गेल्या तीन वर्षांपासून "राजगड न्यूज" मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
ताज्या बातम्या

Bhor – भोर वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर साष्टांग प्रणाम आंदोलन; लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे

August 13, 2025
ताज्या बातम्या

Bhor- रास्ता रोको आंदोलन !! भोरला रस्त्यांसाठी शाळकरी विद्यार्थ्यांचा एल्गार  ; भोर- कापूरव्होळ रस्त्यांची दयनीय अवस्था ; शाळेच्या विद्यार्थ्यांसह भोलावडे पंचक्रोशीतील नागरिकांचे रास्ता रोको आंदोलन

August 5, 2025
Next Post
जेजुरीः ट्रस्टीच्या मनमानी कारभारामुळे विजयादशमीचा मानकरी जेजुरीचा ऐतिहासिक ‘महाखंडा’ अद्यापही उपेक्षित; शस्त्राचा अवमान केल्याची नागरिकांनी व्यक्त केली खंत

जेजुरीः ट्रस्टीच्या मनमानी कारभारामुळे विजयादशमीचा मानकरी जेजुरीचा ऐतिहासिक 'महाखंडा' अद्यापही उपेक्षित; शस्त्राचा अवमान केल्याची नागरिकांनी व्यक्त केली खंत

ताज्या बातम्या

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
Breking News: गर्भलिंग निदान प्रकरणात किकवीच्या डॉ. मंदार माळी यांच्यावर गुन्हा दाखल,पोलिसांकडून शोध सुरू

Breking News: गर्भलिंग निदान प्रकरणात किकवीच्या डॉ. मंदार माळी यांच्यावर गुन्हा दाखल,पोलिसांकडून शोध सुरू

May 30, 2026
न्हावी परिसरात कॉपर केबल चोरी; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

न्हावी परिसरात कॉपर केबल चोरी; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

May 26, 2026
“महामार्ग पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद” – आमदार भीमराव तापकीर

“महामार्ग पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद” – आमदार भीमराव तापकीर

May 26, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

RajgadNews.Live हे महाराष्ट्रातील एक अग्रगण्य स्थानिक मराठी न्यूज पोर्टल आहे. आमचे मुख्य उद्दिष्ट जगभरातील आमच्या वाचकांसाठी ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आणि महत्त्वपूर्ण माहिती अचूकपणे आणि थेट मराठीत पोहोचवणे हे आहे. राजकीय, सामाजिक, क्रीडा असो वा स्थानिक घडामोडी, महाराष्ट्रातील प्रत्येक कानाकोपऱ्यातील बातमी आम्ही तुमच्यापर्यंत प्रामाणिकपणे पोहोचवतो.

Follow Us

Copyright © 2026. Rajgad News.live

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. Rajgad News.live

WhatsApp us