बाळासाहेब चांदोरे यांच्या मार्गदर्शनाखाली लकी ड्रॉ द्वारे विविध आकर्षक भेटवस्तू बक्षीस वाटप
भोर- येथे दिव्यांग बांधवांकरिता महामेळाव्याचे आयोजन बाळासाहेब चांदेरे युवा मंच आणि भोर ,राजगड (वेल्हा ),मुळशीतील दिव्यांग संघटना यांनी रविवार दि.१५ आयोजित केले होते. यावेळी तीनही तालुक्यातील असंख्य दिव्यांग बांधवा मोठ्या उपस्थित होते. उपस्थित राहिलेल्या दिव्यांगामधुन कूपन लकी ड्रॉ काढण्यात आले. लकी ड्रॉ मध्ये ५० दिव्यांगांच्या चिठ्ठ्या काढून विविध प्रकारच्या आकर्षक संसारोपयोगी वस्तू बक्षिसे देण्यात आल्या . यामध्ये टिव्ही, मोबाईल, शिलाई मशीन, पीठ गिरणी, सीलिंग फॅन,टेबल फॅन,प्रेशर कुकर, मिक्सर, गॅस शेगडी, बॅटरी, होम थिएटर, हिटर , या वस्तू लकी ड्रॉ कूपन काढून दिव्यांगाना देण्यात आल्या. तर प्रत्येक बांधवास मेळाव्यात उपस्थित राहिल्याबद्दल आपले कागदपत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी फोल्डर फाईल ही आकर्षक भेटवस्तू देण्यात आली.
कार्यक्रमप्रसंगी पुणे जिल्हा शिवसेना प्रमुख शिंदे गट बाळासाहेब चांदोरे, शिवव्याख्याते गुलाबराव वळसे पाटील, महिला जिल्हाप्रमुख कांताताई पांढरे,उपजिल्हा प्रमुख गणेश निगडे,भोर तालुका प्रहार अपंग संघटना अध्यक्ष बापू कुडले,भोर विधानसभा प्रमुख गणेश मसुरकर, तालुका प्रमुख दशरथ जाधव,शिवाजी भेगडे,(मुळशी),नामदेव वालगुडे( वेल्हा ),सबिना शेख (खंडाळा),प्रशांत रानवडे,सरपंच सचिन मरगळ,भानुदास दुधाने आदींसह हजारो दिव्यांग बांधव उपस्थित होते.
भोर,राजगड (वेल्हा),मुळशी तालुक्यातील हजारो दिव्यांग व्यक्ती विविध योजनांपासून अनेक वर्ष दूर राहिले आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधी नुसते नावापुरते लोकप्रतिनिधी असून दिव्यांग बांधवांची साधी विचारपूस ही त्यांनी कधी केली नाही. महायुती सरकारच्या माध्यमातून दिव्यांगांना विविध योजनांचा लाभ तात्काळ मिळवून देणार असून पुढील काळात दिव्यांगांच्या विकासासाठी कायमच कटिबद्ध राहणार असल्याचे प्रतिपादन याप्रसंगी शिवसेना ( शिंदे गट) जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे यांनी केले.