भोरः राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वतीने भोर विधानसभेच्या उमेदवाराचे नावे अद्यापर्यंत जाहीर झाले नसताना, भोर विधानसभा मतदारसंघामध्ये खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी आमचं ठरलंय असं म्हणत, एकच वादा संग्रामदादा असे वक्तव्य केले होते. तसेच महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून आमदार संग्राम थोपटे यांचे नाव जाहीर केल्यामुळे भोर, वेल्हा (राजगड), मुळशी तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सुळे यांच्या विधानाबाबात खंत व्यक्त केली आहे. तसेच सुळे यांच्या विधानामुळे शिवसैनिक नाराज झाल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबत पत्रकार परिषद घेत खा. सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करण्यात आली. यामुळे आता महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे. या पत्रकार परिषदेमध्ये उपजिल्हाप्रमुख संतोष मोहोळ, भोर तालुका प्रमुख – हनुमंत कंक, मुळशी तालुका प्रमुख – सचिन खैरे ,वेल्हा (राजगड) – दीपक दामगुडे आदी उपस्थित होते.
मतदारसंघामध्ये शिवसेनेची ताकद वाढली असून महायुती असताना केवळ चार हजाराच्या फरकाने पक्षाचा उमेदवार पराभूत झाला होता. यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेला मिळावा पाहिजे, असा दावा उबाठा गटाकडून करण्यात आला आहे.
अंतिम उमेदवारी जाहीर झाली नसताना असे विधान करणे चुकीचेच
राजगड न्युज लाईव्ह सोबत बोलताना वेल्हा तालुका प्रमुख दीपक दामगुडे म्हणाले की, आम्हाला आमच्या पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा कोणत्याही प्रकारचा आदेश नाही. तसेच उमेदवार घोषित केल्याबाबत देखील सांगण्यात आलेले नाही. वेल्हा येथील सभेत जाहीर केलेली उमेदवारी ही अंतिम नसून आपल्या खासदारांनी याबाबत घोषित करणे चुकीचेच आहे. या विधानसभेवर पक्ष प्रमुखांकडे दावा करणार असल्याबाबत सांगणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुढे बोलताना, उपजिल्हाप्रमुख संतोष मोहोळ म्हणाले, भोर, वेल्हा मुळशी हा मतदार संघ हा शिवसेनेचा मतदार संघ असून यावर आम्ही पक्ष प्रमुख यांच्याकडे सर्व शिवसैनिकांकडून विधानसभा लढविण्याबावत इच्छा व्यक्त करणार आहोत. यामुळे खा. सुप्रिया यांच्या विधानावर खंत व्यक्त करीत उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांनी भोर विधानसभेवर दावा सांगितल्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
ही जागा आम्हालाच मिळाली पाहिजे
तालुक्यामध्ये दोन दिवसांपूर्वी खा. सुप्रिया सुळे आणि आ. संग्राम थोपटे यांनी भूमी पूजनाचा कार्यक्रम घेतला होता, त्या कार्यक्रमामध्ये सुप्रिया सुळे यांनी संग्राम थोपटे निवडणूक लढणार असल्याबाबातचे सूतावोच केले होते. यामुळे शिवसेनेकांच्या भावना दुखावल्या आहेत, याचे कारण म्हणजे अजून महाविकास आघाडीत या जागेबाबात कोणताही निर्णय झालेला नाही. आणि ही जागा जर तसे पाहिले तर आम्हाला मिळाली पाहिजे, असा दावा उपजिल्हा प्रमुख संतोष मोहोळ यांनी केला आहे.
याप्रकरणी मातोश्रीवर जाणार
खा. सुप्रिया सुळे यांच्या विधानाला उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात विरोध होत असून, त्यांच्या विधानबाबात नाराजी व्यक्ती केली आहे. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळेंना भेटणार असून, पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मातोश्रीवर जाऊन भेट घेऊन याविषयी सांगणार असल्याचे यावेळी बोलताना सांगण्यात आले. यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भोर विधासभेच्या जागेबाबत कोणाला उमेदवारी मिळणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.