Monday, June 8, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

भोरः उत्रौली येथे बालविकास व उद्‌बोधन कार्यशाळा संपन्न

बालहक्क सुरक्षा -जनजागृती या विषयावर करण्यात आले मार्गदर्शन

by Team Rajgad Publication
August 30, 2024

भोरः उत्रौली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून तालुकास्तरीय बालविकास व चालू घडामोडींवर आधारित उद्‌बोधन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. भोर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे व गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा संपन्न झाली.

राज्यात सध्या संवेदनशील गुन्हे घडत आहेत. काही दिवसांपूर्वी बदलापूर येथे शाळेमध्ये लहान मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. यामुळे सगळीकडे अधिकारी, शिक्षक, पालक, समाज व विद्यार्थी यांना काळजीत टाकणाऱ्या मन सुन्न करणाऱ्या घटना घडत आहेत. महिला व बालक यांच्यावर होणारे लैंगिक, शारीरिक व मानसिक अत्याचार समाजाच्या अधःपतनास कारणीभूत ठरत आहेत. त्या अनुषंगाने “बालहक्क सुरक्षा -जनजागृती ” या अतिसंवेदनशील विषयांवर या कार्यशाळेमध्ये भोरच्या संरक्षण अधिकारी एम .जी. जाधव तसेच एन .बी. मोरे यांनी महिला आणि कायदे, पोस्को (P0CSO )कायदा , कौटुंबिक हिंसाचार आणि संरक्षण, छेडछाड विरोधी कायदा , बाललैंगिक अत्याचार आणि जागरुकता, तक्रारीची पद्धत व कार्यवाही या विषयांवर विशेष मार्गदर्शन केले.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

याप्रसंगी कायदे विषयक माहिती पुस्तकांचे वाटप करण्यात आले. प्रत्येक शाळेत उद्बोधन वर्ग घेऊन लहान मुली, मुले व स्त्रिया यांविषयी विविध कायदे तसेच सद्यस्थितीत नेमके काय करावे, अंमलबजावणी कशी करावी, याबद्दल विशेष मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेमध्ये 50 प्राथमिक शिक्षक,  24 केंद्रप्रमुख, गटसाधन केंद्र कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता. या प्रसंगी विस्तार अधिकारी विठ्ठल गुंड, सुधीर साने, तालुका गटसमन्वयक प्रभावती कोठावळे, केंद्रप्रमुख संघटना तालुका अध्यक्षा अंजना वाडकर, केंद्रप्रमुख सखाराम बलकवडे, पद्मजा नाईक, मंगल मालुसरे, सुनिता गायकवाड, साधना गायकवाड, सुषमा पाटील, अलका लोखंडे, संजय ताम्हाणे, शिवाजी जाधव, विजय थोपटे, अरविंद बढे, पोपट तांगडे, गुणवंत इंगळे, राजू पडवळ, शैला कोठावळे उपस्थित होते.

Tags: Bhorrajgadnews
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post

मोठी बातमीः कोंढव्यात ATS ची छापेमारी; बनावट टेलिफोन एक्स्चेंज सेंटरचा केला पर्दाफाश

ताज्या बातम्या

केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

June 7, 2026
भोर तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई केव्हा? की संगनमत?

भोर तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई केव्हा? की संगनमत?

June 6, 2026
भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
राजकारणातील भीष्मपितामहाला अखेरचा निरोप; मा. मंत्री अनंतराव थोपटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

राजकारणातील भीष्मपितामहाला अखेरचा निरोप; मा. मंत्री अनंतराव थोपटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

June 5, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group