भोर: हिंदूवर झालेल्या अत्याचार विरोधात आणि देशात हिंदू मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ भोरमध्ये हिंदू संघटनांचा निषेध मोर्चा काढण्यात आला. मिलिंद एकबोटे यांच्या नेतृत्वाताखाली या हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मोर्चामध्ये भगवे झेंडे घेऊन आणि हातात निषेधाचे फलक घेऊन मोठ्या संख्येने हिंदू संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. भोरमधील शिवतीर्थ चौपाटी ते राजवाडा चौक असा शहरातून मोर्चा काढण्यात आला.
मोर्चा दरम्यान हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी केली. बांगलादेशी हिंदूंची हत्या, बलात्कार व लवजिहाद करून दलित मुलगी यशश्री शिंदे, पुजा पवार व अशा अनेक हिंदू मुलींच्या झालेल्या हत्या व देशात जिहाद, दहशतवाद या सर्व ज्वलंत विषयांविरोधात निषेध नोंदविण्यात आला. तसेच या घटनेतील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, हि मागणी करण्यात आली.