बदलापूरः मुंबईतील बदलापूर येथील दोन चिमुकलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराबद्दल जन आंदोलन सुरू होते. यावेळी दैनिक सकाळच्या पत्रकार मोहिनी जाधव या वार्तांकन करून आपले पत्रकारितेचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडत होत्या. आपले कर्तव्य बजावत असताना बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी पत्रकार मोहिनी जाधव यांना अर्वाच भाषा वापरली. तसेच मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. या प्रकाराचा निषेध अनेक घटकांकडून नोंदविण्यात येत आहे. या प्रकरणी स्वःताह मोहिनी जाधव पोलीस स्थानकांत तक्रार नोंदविण्यासाठी गेल्या असता त्यांची तक्रार घेतली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
तुमच्यावर रेप झालाय का, तर तुम्ही बातमी करायला आला आहात’ – हे वाक्य शिंदे गटाचा नेता आणि माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांचे. शिंदेंच्या गटाचा नेता आणि बदलापूरचा शहरप्रमुख वामन म्हात्रे आहेत. या प्रकरणी स्वःताह मोहनी जाधव यांनी त्यांच्यावर अर्वाच भाषा वापरली म्हणून तक्रार देण्यासाठी गेल्या असता त्यांची तक्रार नोंदवून घेतली नाही. तसेच सध्या बदलापूर घटनेचे प्रेशर असल्याचे कारण पोलिसांनी या महिला पत्रकारला दिले, असल्याचे स्वःताह मोहिनी जाधव यांनी सांगितले आहे.