Friday, June 5, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

बदलापूर घटना: आयजी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेत एसआयटी; तीन पोलीस निलंबित, उज्वल निकम सरकारी वकील

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

by Team Rajgad Publication
August 22, 2024

मुंबई: बदलापूर येथे घडलेली घटना अतिशय दुर्दैवी, निंदनीय आणि मन हेलावून टाकणारी आहे. या प्रकरणात वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेत एसआयटी गठीत करण्याचे तसेच कर्तव्यात कसूर करणार्‍या तीन पोलिसांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या घटनतेतील खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलिस आयुक्तांना देण्यात आले. या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. उज्वल निकम यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नवी दिल्ली येथे ते माध्यमांशी बोलत होते.

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत आवश्यक ती कारवाई केली जात असून, फास्ट ट्रॅक कोर्टासाठी प्रस्ताव मागविण्यात आला आहे. संवेदनशीलतेने पोलीस परिस्थिती हाताळत आहेत. ही घटना उघडकीस आल्यावर तातडीने कारवाई करण्यात आली. तथापि कुठे काही विलंब असेल, तर एसआयटी त्याची चौकशी करेल आणि त्यात दोषी आढळणार्‍यांवर कडक कारवाई करण्यात येईल.

You might also like

मी शपथ घेतो की……..; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली शपथ ग्रहण, राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार…!

नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ?, उपमुख्यमंत्री अजित पवार: शिवसेनेकडून ‘या’ नेत्यांना मिळू शकते उपमुख्यमंत्री पदाची संधी

भाजप पक्षाच्या विधीमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड; पुन्हा एकदा राज्यात देवेंद्रपर्व, उद्या फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार

अशा गंभीर घटनांमध्ये राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न विरोधक करीत असून, तो दुर्दैवी आहे. संवेदनाहीन विरोधी पक्ष केवळ राजकारण करीत आहेत. माजी मुख्यमंत्री पदावर राहिलेल्या व्यक्तीने इतक्या खालच्या स्तराला जाऊन राजकारण करणे, हे त्यांना शोभत नाही. अशा प्रकरणात न्याय कसा मिळवून देता येईल, याचा प्रयत्न करायचा असतो. सध्या कायदा आणि सुव्यवस्था राखणे आणि त्या मुलींना न्याय देणे याला प्राधान्य आहे. आंदोलकांमध्ये कोण आहेत, यावर या घडीला चर्चा करण्यात अर्थ नाही, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

बदलापूरच्या घटनेत प्रारंभीच्या काळात कर्तव्यात कुचराई करणारे बदलापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि हेडकॉन्स्टेबल यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना  दिले.

Tags: aratisinghbadalapurnewsbadalapurpolicedevendrafadanvis
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

मी शपथ घेतो की……..; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली शपथ ग्रहण, राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार…!
ताज्या बातम्या

मी शपथ घेतो की……..; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली शपथ ग्रहण, राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार…!

December 5, 2024
नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ?, उपमुख्यमंत्री अजित पवार: शिवसेनेकडून ‘या’ नेत्यांना मिळू शकते उपमुख्यमंत्री पदाची संधी
ताज्या बातम्या

नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ?, उपमुख्यमंत्री अजित पवार: शिवसेनेकडून ‘या’ नेत्यांना मिळू शकते उपमुख्यमंत्री पदाची संधी

December 4, 2024
भाजप पक्षाच्या विधीमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड; पुन्हा एकदा राज्यात देवेंद्रपर्व, उद्या फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार
ताज्या बातम्या

भाजप पक्षाच्या विधीमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड; पुन्हा एकदा राज्यात देवेंद्रपर्व, उद्या फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार

December 4, 2024
ठरलं..? केंद्रात नरेंद्र आणि राज्यात पुन्हा देवेंद्र; ५ डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधी, फडणवीस घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ ? 
ताज्या बातम्या

ठरलं..? केंद्रात नरेंद्र आणि राज्यात पुन्हा देवेंद्र; ५ डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधी, फडणवीस घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ ? 

November 30, 2024
Breaking News: एकनाथ शिंदेंचा मंत्रीमंडळात सहभागी होण्यास नकार ? त्यांच्याऐवजी नव्या चेहऱ्याची चाचपणी ? शिंदे केंद्रात जाणार ? सूत्रांची माहिती
ताज्या बातम्या

Breaking News: एकनाथ शिंदेंचा मंत्रीमंडळात सहभागी होण्यास नकार ? त्यांच्याऐवजी नव्या चेहऱ्याची चाचपणी ? शिंदे केंद्रात जाणार ? सूत्रांची माहिती

November 29, 2024
खेड शिवापूर टोल नाक्यावर राजगड पोलिसांची कारवाई : लाखोंचा गुटखा जप्त
ताज्या बातम्या

खेड शिवापूर टोल नाक्यावर राजगड पोलिसांची कारवाई : लाखोंचा गुटखा जप्त

October 27, 2024
Next Post
Pune: एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली; महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या बैठकीत निर्णय

Pune: एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली; महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या बैठकीत निर्णय

ताज्या बातम्या

सुरवडची तहान कायम! दोन विहिरी, दोन टाक्या तरीही ग्रामस्थ पाण्यापासून वंचित

सुरवडची तहान कायम! दोन विहिरी, दोन टाक्या तरीही ग्रामस्थ पाण्यापासून वंचित

June 4, 2026
दुःखद बातमी : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचे निधन; पुणे जिल्ह्यावर शोककळा

दुःखद बातमी : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचे निधन; पुणे जिल्ह्यावर शोककळा

June 4, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp us