भाटघर,निरा देवघर धरणातून कमी अधिक प्रमाणात होत आहे विसर्ग
भोर पुणे मार्गावर असणारे भोर सांगवी, हारतळी येथील पूल भाटघर व नीरा देवधर धरणातील पाणीसाठा वाढल्याने विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढवल्याने सुरक्षितेसाठी वाहतुकीसाठी काही काळापुरते बंद केले होते.परंतु हळूहळू पाणी विसर्ग कमी होऊ लागल्याने हे पूल पुन्हा वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहे असे प्रशासनाकडून सांगण्यात आले
आज सकाळपासून घाट माथ्यासह संपूर्ण तालुक्यात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत आहे.त्यातच आज दुपारी बारा एकच्या दरम्यान भाटघर धरणातून जवळपास 26 हजार क्युससने पाणी विसर्ग नदीपात्रात सुरू केल्याने जास्त प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाल्याने हारतळी पुलास व सांगवी येथील पूलास पाणी लागल्यामुळे नायब तहसीलदार सो खंडाळा यांनी सदर पुलावरील वाहतुकीचा रस्ता बंद करणे सांगितले होते .त्यामुळे भोर प्रशासनानेही खबरदारी म्हणून भोरच्या हद्दीतील सांगवी जवळील पुल बंद केला होता.सदर ठिकाणी शिरवळ पोलीस व भोर पोलीस असा बंदोबस्त लावून रस्ता बंद केलेला होता परंतु सध्या पाण्याचा विसर्ग कमी झाल्यामुळे रस्ता चालू पून्हा वाहतूकीसाठी खूला केला आहे असे संबंधित प्रशासनाकडून सांगण्यात आले.