Thursday, June 18, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Breking News | घरगुती वादातून पत्नीची गळा आवळून हत्या; पतीविरुद्ध राजगड पोलिसांत गुन्हा

by SBPRNL
June 18, 2026
Breking News | घरगुती वादातून पत्नीची गळा आवळून हत्या; पतीविरुद्ध राजगड पोलिसांत गुन्हा

खेड शिवापूर : हवेली तालुक्यातील आर्वी येथे घरगुती वादातून विवाहितेची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी पतीविरुद्ध राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुतुजा अक्षय तावरे (वय २५, रा. आर्वी, ता. हवेली) असे मृत विवाहितेचे नाव असून, अक्षय रामदास तावरे (वय २८, व्यवसाय सलून, रा. आर्वी, ता. हवेली) याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मयत रुतुजा तावरे हिचा भाऊ अनिकेत दादासो पवार (वय २६, व्यवसाय सलून, रा. पणदरे, ता. बारामती) यांनी राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, १७ जून २०२६ रोजी दुपारी सव्वादोन वाजण्याच्या सुमारास आर्वी येथील राहत्या घरी पती-पत्नीमध्ये घरगुती कारणावरून वाद झाला. यावेळी आरोपी अक्षय तावरे याने पत्नीला वारंवार शारीरिक व मानसिक त्रास देत ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून ठार मारल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

You might also like

महारेराचा खंडाळा परिसराला मोठा दणका; अनेक गृहप्रकल्प ‘लॅप्स’ घोषित, गुंतवणूकदारांमध्ये चिंता

जन्मानंतरच मृत्यू की अन्य काही? नवजात बालिकेच्या मृतदेहाने खळबळ

मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; सहा जणांविरुद्ध गुन्हा

घटनेची माहिती मिळताच भोर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी गौर, प्रभारी पोलीस निरीक्षक जाधव आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे आर्वी परिसरात हळहळ व्यक्त होत असून, परिसरात शोककळा पसरली आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड करीत आहेत.

SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

महारेराचा खंडाळा परिसराला मोठा दणका; अनेक गृहप्रकल्प ‘लॅप्स’ घोषित, गुंतवणूकदारांमध्ये चिंता
खंडाळा

June 17, 2026
जन्मानंतरच मृत्यू की अन्य काही? नवजात बालिकेच्या मृतदेहाने खळबळ
क्राईम

June 16, 2026
मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; सहा जणांविरुद्ध गुन्हा
भोर

सातारा पोलिसांच्या नाकावर टिच्चून पुणे पोलिसांची खंडाळ्यात धडक कारवाई; एमडी ड्रग्ज प्रकरणात माजी उपसरपंचासह पाच जणांवर गुन्हा

June 15, 2026
“ज्यांच्या हातून संस्कार मिळाले, त्याच आजोबांचा नातवाकडून निर्घृण अंत!”

नव्या पोलिस निरीक्षकांचा कडक इशारा; कायदा मोडाल तर कारवाई होणारच!

ताज्या बातम्या

Breking News | घरगुती वादातून पत्नीची गळा आवळून हत्या; पतीविरुद्ध राजगड पोलिसांत गुन्हा

Breking News | घरगुती वादातून पत्नीची गळा आवळून हत्या; पतीविरुद्ध राजगड पोलिसांत गुन्हा

June 18, 2026
महारेराचा खंडाळा परिसराला मोठा दणका; अनेक गृहप्रकल्प ‘लॅप्स’ घोषित, गुंतवणूकदारांमध्ये चिंता

महारेराचा खंडाळा परिसराला मोठा दणका; अनेक गृहप्रकल्प ‘लॅप्स’ घोषित, गुंतवणूकदारांमध्ये चिंता

June 17, 2026
जन्मानंतरच मृत्यू की अन्य काही? नवजात बालिकेच्या मृतदेहाने खळबळ

जन्मानंतरच मृत्यू की अन्य काही? नवजात बालिकेच्या मृतदेहाने खळबळ

June 16, 2026
मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; सहा जणांविरुद्ध गुन्हा

मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; सहा जणांविरुद्ध गुन्हा

June 16, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group