Saturday, June 13, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

कौतुकास्पद : गणेश किंद्रे यांची मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयाच्या सहाय्यकपदी निवड

by SBPRNL
January 10, 2025
कौतुकास्पद : गणेश किंद्रे यांची मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयाच्या सहाय्यकपदी निवड

भोर: आर्थिक परिस्थितीवर मात करून, जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर रायरी (ता. भोर) येथील गणेश तुकाराम किंद्रे यांनी मोठे यश संपादन केले आहे. मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालय सहाय्यकपदी निवड होऊन त्यांनी आपल्या कुटुंबाचे आणि गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.

गणेश हे लहानपणापासूनच अभ्यासात अतिशय हुशार होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण रायरेश्वर किल्याच्या पायथ्याशी असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. त्यानंतर भोर येथील राजा रघुनाथराव विद्यालयातून ११वी आणि १२वी वाणिज्य शाखेचे शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या वडिलांचे मुंबईतील वाशी मार्केटमध्ये मेवा मसाल्याच्या दुकानात काम असल्याने पुढील शिक्षणासाठी गणेश मुंबईला गेले. तेथे त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील मॉडर्न कॉलेजमधून बी.कॉम.ची पदवी मिळवली.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

शिक्षण घेत असतानाच गणेश यांनी एमपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. अनेक प्रयत्नांनंतर अखेर पाच वर्षांच्या अथक परिश्रमानंतर त्यांनी मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालय सहाय्यक परीक्षा उत्तीर्ण केली आहे. कोणत्याही खासगी शिकवणीशिवाय स्वतःच्या अभ्यासाच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले.

“गणेशने आमचे स्वप्न पूर्ण केले”

गणेशचे वडील तुकाराम किंद्रे म्हणाले, “मुलाने उच्चशिक्षित होऊन चांगल्या नोकरीत जावे, हे आमचे स्वप्न होते. हालाखीच्या परिस्थितीतही गणेशने चिकाटी ठेवली आणि आज हे यश मिळवले. आम्हाला त्याचा अभिमान आहे.”

Tags: BhorCortGaneshkinderemumbaiPune
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post

Bhor -आदर्श माता पुरस्काराने शुभांगी शिवतरे सन्मानित ; राजमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित्त मिळाला पुरस्कार

ताज्या बातम्या

पुण्यातील मीडिया संस्थेविरोधात तीन महिला पत्रकारांची तक्रार; व्यवस्थापनातील पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

पुण्यातील मीडिया संस्थेविरोधात तीन महिला पत्रकारांची तक्रार; व्यवस्थापनातील पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

June 12, 2026
शिंदेवाडीत जुगार अड्ड्यावर राजगड पोलिसांचा छापा; ३० लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

शिंदेवाडीत जुगार अड्ड्यावर राजगड पोलिसांचा छापा; ३० लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

June 12, 2026
विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

June 9, 2026
भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

June 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group