पुणे: एका भरधाव वेगाने आलेल्या आलिशान कारने वाहतूक विभागातील महिला कर्मचाऱ्याला उडविल्याची घटना घडली आहे. या घटनेत महिला कर्मचारी गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. ड्रंक अॅन्ड ड्राईव्हच्या कारवाईनिमित्त नाकाबंदी करून कारवाई करीत असताना रात्री पावणे दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अलिशान कारमध्ये चौघेजण असल्याची मीहिती मिळत असून घटनेनंतर आरोपींनी त्या ठिकाणाहून पसार झाले आहेत. या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांत अज्ञांताविरोधात गुन्हा दाखल झाला असून आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
ड्रंक अँड ड्राईव्हच्या कारवाईनिमित्त नाकाबंदीकरून कारवाई करत असताना एका भरधाव आलिशान कारने कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक विभागातील महिला कर्मचाऱ्याला उडविले. यात महिला कर्मचारी गंभीररित्या जखमी झाल्या असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, आलिशान कारमध्ये चौघेजण असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. महिला अंमलदार दीपमाला राजू नायर (वय ३५) असे गंभीर जखमी झालेल्या महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे.
मद्यप्राधन करून वाहन चालविली अन्
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपमाला नायर या बंडगार्डन वाहतूक विभागात नेमणूकीस आहेत. मध्यरात्री ड्रंक अँड ड्राईव्ह ही विशेष मोहिम राबवत आहे. त्यामुळे बंडगार्डन वाहतूक विभाग आरटीओ ऑफिसजवळील नायडू लेन याठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली होती. त्याठिकाणी नायर व त्यांचे सहकारी तसेच वरिष्ठ अधिकारी वाहनांची तपासणी करून मद्य पिऊन वाहने चालविली जात आहेत का, याची तपासणी करत होत्या. त्यावेळी कोरेगांव पार्क किंवा येरवडा भागाकडून एका आलिशान भरधाव कार आली. बॅरिकेट टाकून नाकाबंदी सुरू असतानाही भरधाव आलेल्या कारने एका बॅरिकेटला उडविले. त्यापुर्वी एका कारला देखील त्याने धडक दिली. नंतर कारने नायर यांना जोराची धडक दिली. त्यानंतर तो तेथून वेगाने पसार झाला. अपघातानंतर पोलिसांनी कारचा पाठलाग केला. मात्र, त्याचा काही थांगपत्ता पोलिसांना लागला नाही. नायर यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास बंडगार्डन पोलीस हे करत आहेत.