Tuesday, August 4, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

पुण्यात ‘कारनामा’: आलिशान कारची नाकाबंदीवर असणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला जोराची धडक; पोलिसांनी केला पाठलाग पण……;

by SBPRNL
December 10, 2024
पुण्यात ‘कारनामा’: आलिशान कारची नाकाबंदीवर असणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला जोराची धडक; पोलिसांनी केला पाठलाग पण……;

पुणे: एका भरधाव वेगाने आलेल्या आलिशान कारने वाहतूक विभागातील महिला कर्मचाऱ्याला उडविल्याची घटना घडली आहे. या घटनेत महिला कर्मचारी गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. ड्रंक अॅन्ड ड्राईव्हच्या कारवाईनिमित्त नाकाबंदी करून कारवाई करीत असताना रात्री पावणे दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अलिशान कारमध्ये चौघेजण असल्याची मीहिती मिळत असून घटनेनंतर आरोपींनी त्या ठिकाणाहून पसार झाले आहेत. या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांत अज्ञांताविरोधात गुन्हा दाखल झाला असून आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,

ड्रंक अँड ड्राईव्हच्या कारवाईनिमित्त नाकाबंदीकरून कारवाई करत असताना एका भरधाव आलिशान कारने कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक विभागातील महिला कर्मचाऱ्याला उडविले. यात महिला कर्मचारी गंभीररित्या जखमी झाल्या असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, आलिशान कारमध्ये चौघेजण असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. महिला अंमलदार दीपमाला राजू नायर (वय ३५) असे गंभीर जखमी झालेल्या महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे.

मद्यप्राधन करून वाहन चालविली अन्

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपमाला नायर या बंडगार्डन वाहतूक विभागात नेमणूकीस आहेत. मध्यरात्री ड्रंक अँड ड्राईव्ह ही विशेष मोहिम राबवत आहे. त्यामुळे बंडगार्डन वाहतूक विभाग आरटीओ ऑफिसजवळील नायडू लेन याठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली होती. त्याठिकाणी नायर व त्यांचे सहकारी तसेच वरिष्ठ अधिकारी वाहनांची तपासणी करून मद्य पिऊन वाहने चालविली जात आहेत का, याची तपासणी करत होत्या. त्यावेळी कोरेगांव पार्क किंवा येरवडा भागाकडून एका आलिशान भरधाव कार आली. बॅरिकेट टाकून नाकाबंदी सुरू असतानाही भरधाव आलेल्या कारने एका बॅरिकेटला उडविले. त्यापुर्वी एका कारला देखील त्याने धडक दिली. नंतर कारने नायर यांना जोराची धडक दिली. त्यानंतर तो तेथून वेगाने पसार झाला. अपघातानंतर पोलिसांनी कारचा पाठलाग केला. मात्र, त्याचा काही थांगपत्ता पोलिसांना लागला नाही. नायर यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास बंडगार्डन पोलीस हे करत आहेत.

Tags: bandgardanpolicePunepunecrimenewspunepolicerajgadnews
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,
क्राईम

संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,

July 18, 2025
पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची नवी प्रभाग रचना आज जाहीर होणार
पुणे

पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची नवी प्रभाग रचना आज जाहीर होणार

July 14, 2025
ताज्या बातम्या

Rajgad News बातमी इफेक्ट- भोलावडेच्या पृथ्वीराज पेट्रोल पंपाजवळच्या रस्त्यावरील खड्डा बुजविला 

June 26, 2025
8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर
क्राईम

8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर

February 15, 2025
Next Post
डोळ्यात स्प्रे मारून पिस्तुलाचा धाक दाखवून सराफा दुकानात चोरी; पुण्यातील ‘या’ भागातील घटना

डोळ्यात स्प्रे मारून पिस्तुलाचा धाक दाखवून सराफा दुकानात चोरी; पुण्यातील 'या' भागातील घटना

ताज्या बातम्या

ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

July 28, 2026
पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत

पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत

July 20, 2026
भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

July 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group