भोर : महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर मांडेकर प्रचारार्थ तालुक्यातील गावांना भेट देत नागरिकांशी संवाद साधला. यावेळी स्थानिक युवकांना रोजगार निर्मितीच्या संधी देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी दिली. तसेच मी उमेदवार नसून, सर्वसामान्य जनता उमेदवार आहे हेच लक्षात ठेवून मतदान करा, अशी भावनिक साद मांडेकर यांनी येथील नागरिकांना घातली.
या दौऱ्यात त्यांच्यासोबत माजी आमदार शरद ढमाले, माजी उपसभापती रणजित शिवतरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष, भाजपचे तालुकाध्यक्ष जीवन कोंडे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख दशरथ जाधव, आणि आरपीआयचे तालुकाध्यक्ष सुनील गायकवाड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
‘या’ गावातील नागरिकांशी साधला संवाद
आंबेघर, चिखलावडे, नाटंबी, कारंजे, कारंजेवाडी, पानव्हळ, नाझरे, कर्णावड, रावडी, चिखलगाव, टिटेघर, कोर्ले, वडतुंबी, म्हाकोशी, आंबवडे, घोरपडेवाडी, सांघवी, कारी, अंगसुळे, भावेखल, आपटी, नांदगाव, वाठार हिमा, पिसावरे या गावांना मांडेकर यांनी भेट दिली. त्यांच्या या दौऱ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.