आध्यात्मिक ज्ञानमंञ वारकरी शिक्षण संस्थेचा पुढाकार
भोर तालुक्यातील आपटी (ता.भोर) येथे हिंदवी स्वराज्याची शपथ घेतलेल्या स्वराज्य भूमीत आध्यात्मिक ज्ञानमंञ वारकरी शिक्षण संस्थेच्या पुढाकाराने साकारलेल्या श्री छञपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचा १ जानेवारी रोजी कलशारोहण सोहळा होणार असल्याची माहिती झी टॉकीज फेम संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प राहूल महाराज पारठे यांनी सांगितले .
शिवरायांचे जिल्ह्यात शिवालयाची निर्मिती व्हावी यासाठी अध्यात्मिक शिक्षण संस्थेने आपल्या वर्धापदिनाच्या शुभ मुहूर्तावर स्वराज्य उभारणीसाठी हातभार लावलेल्या भोर तालुक्यातील बारा मावळातील मावळ्यांच्या वंशजांच्या शुभहस्ते १ जानेवारी २०२२ ला श्री छञपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचा भुमिपुजन सोहळा संपन्न झाला होता. या मंदिराच्या बांधकामास सुरुवात झाल्यानंतर अनेक शिवप्रेमी , लोकवर्गणी , वस्तुस्वरुपात मदत , ग्रामस्थांनी एक हात मदतीचा पुढे करत सुमारे ३५ लाख रुपये खर्च करुन मंदिरांच्या कलशारोहनचे काम पूर्ण केले आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला या श्री छञपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचा कलशारोहण करण्यात येणार असल्याने शिवप्रेमी , वारकरी , ग्रामस्थांनी यासोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहन राहुलमहाराज पारठे यांनी केले आहे.
१ जानेवारी २०२५ रोजी संस्थेच्या चतुर्थ वर्धापदिनानिमित्त सकाळी ९ ते १२ या वेळेत श्री छञपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीची मिरवणूक / शोभा याञा करण्यात येणार आहे. दुपारी २ ते ३ मूर्तीचे पुजन , ३ ते ४ पुरस्कार वितरण सोहळा, ४ ते ५ शाहिर पोवाडा कार्यक्रम, ५ ते हरिपाठ ६ ते ८ या वेळेत ह.भ.प अनिल महाराज देवळेकर यांचे शिवचरित्र सुश्राव्य किर्तन व रात्री ८ नंतर महाप्रसाद असे नियोजन करण्यात असे आहे .
पश्चिम महाराष्ट्रातील श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे भोर तालुक्यातील आपटीतील पहिले शिवमंदिर असल्याचे शिवप्रेमींकडून सांगण्यात आले आहे.