Tuesday, August 18, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

वेळवंड खोऱ्यात पहाटे भात कापणीला पसंती ; रब्बी हंगामातील पीक पेरणीसाठी भात खाचरे मोकळी करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग

मनुष्यबळाअभावी यांत्रिकीकरणावर जादा भर ; बैल जोडीची भात मळणी काळाच्या पडद्याआड

by Aakanksha Yadav
November 9, 2024
वेळवंड खोऱ्यात पहाटे भात कापणीला पसंती ; रब्बी हंगामातील पीक पेरणीसाठी भात खाचरे मोकळी करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग

भोर : तालुक्याच्या पश्चिमेकडील वेळवंड खोऱ्यात सध्या भात कापणीला वेग आला असून सकाळी भल्या पहाटे शेतकरी भात कापणीला पसंती देत असल्याचे चित्र आहे. तसेच मोकळी झालेली भात खाचरे रब्बी हंगामातील पीक पेरणी मोकळी  करण्यात शेतकरी व्यस्त आहे . सालभराच आपलं महत्वाचे प्रमुख भात पीक घेण्यासाठी शेतातील कामात बळीराजा  मग्न झाला आहे. 

सध्या ग्रामीण भागातून बैलजोडीची संख्या कमी झाल्याने शेतकऱ्यांनी भात मळणीसाठी यांत्रिकीकरणाला पसंती दिली आहे हार्वेस्टर, ट्रॅक्टर भरडणी यंत्र अशा यंत्रांचा भात मळण्यासाठी  उपयोग होत आहे . बैलजोडीची मळणी आता हळूहळू काळाच्या पडद्यात जात चालली आहे, क्वचित दुर्गम भागात बैलजोडीची मळणी पाहायला मिळत आहे.   

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

भोर तालुका भाताचे आगार म्हणून ओळखला जातो यावर्षी मात्र भातपिकाला अधिक प्रमाणात पाऊस झाल्याने भात पिकाचा उतारा कमी राहिला असल्याचे व काही भात पिके ही भरण्याच्या वेळेस पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्याने भाताचा फूलोरा झडल्याने भात पळंजावर गेले आहे असे या भागातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यावर्षी भात पिकाला करपा रोगाच्या प्रादुर्भावाने व उशिरा भात काढल्याने पळंजावर गेल्याने भात पिकाला उतारा कमी मिळाला आहे असे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.  कोळंबा ,रत्नागिरी चोवीस , इंद्रायणी हळवी,गरवी ,सोनम , बासमती ,कोलम , पार्वती , इंडम , रत्ना अशा या जातीची भात पिके काढली जात असून सकाळच्या भल्या पहाटे व सायंकाळी शेतातील काम हे जास्त प्रमाणात होत आहेत असे बसरापुर मधील शेतकरी दत्तात्रय पवार , मोहन पवार, सौरभ तानाजी झांजले, अंकुश कुंभारकर , विजय कुंभारकर, लक्ष्मण कुंभारकर यांनी सांगितले.

Tags: Bhor
Aakanksha Yadav

Aakanksha Yadav

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post
विंझर येथे ३८ बॉक्स देशी दारूसह १.२७ लाख रुपयांची दारू जप्त

विंझर येथे ३८ बॉक्स देशी दारूसह १.२७ लाख रुपयांची दारू जप्त

ताज्या बातम्या

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

August 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group