पिरंगुट: भोर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर मांडेकर यांच्या प्रचारार्थ महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांची बूथ कमिटी बैठक येथे संपन्न झाली. विद्यमान आमदार पुन्हा निवडून आले, तर ते पुढचे पाच वर्षे मतदारसंघात येणार नाहीत. क्रीडा संकुलनाचे काम आमदारांनी निकृष्ट दर्जाचे केले आहे. मुळशीतील तरुणांना रोजगार मिळत नसल्यामुळे गावांमध्ये फक्त ज्येष्ठ मंडळी राहिलेली आहेत. भूमिपूत्रांच्या हाताला काम नसल्याने ते त्यांचे गाव सोडून दुसऱ्या शहरांमध्ये रोजगारासाठी जात आहेत. याला सर्वस्वी आमदार जबाबदार असल्याची टीका शंकर मांडेकर यांनी या बैठकीत केली. तसेच तरुणांना रोजगार व मतदार संघातील इतर प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचे काम करणार असल्याची ग्वाही मांडेकर यांनी या बैठकीत दिली.
या मेळाव्यात महायुतीतील घटक पक्षांचे प्रमुख नेते व कार्यकर्त्यांसोबत आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने संवाद साधण्यात आला. या विधानसभा क्षेत्रज्ञातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी मला पाठिंबा दिला असून, विजयाचा इतिहास २०२४ ची निवडणुकीत घडवूया असा निर्धार मांडेकर यांनी यावेळी बोलताना केला. त्यासाठी बूथ कमिटी बळकट करा असे आवाहन त्यांनी महायुतीमधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले. जे कार्यकर्ते विद्यमान आमदारांसाठी निवडणुकीमध्ये कष्ट घेतात, पण आमदार त्यांच्याकडे लक्षही देत नाहीत, अशी टीका देखील मांडेकरांनी यावेळी केली.
यावेळी डॉ वाय ए नारायण स्वामी विधानपरिषद सदस्य कर्नाटक मुख्य प्रताप कर्नाटक विधान परिषद, मा. आमदार शरदराव ढमाले, सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे जिल्हा नंदू शेठ भोईर, मुळशी तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अंकुश मोरे, कात्रज दुध संघाचे संचालक कालिदास गोपालघरे, ज्येष्ठ नेते किसान नांगरे,राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष राजगड किरण राऊत, मा. सभापती पंचायत समिती मुळशी बाबा कंधारे, कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे जिल्हा सचिन अमराळे, भाजप तालुकाध्यक्ष राजाभाऊ वाघ, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष मुळशी अनुप मारणे, माजी सरपंच सागर साखरे, चंद्रकांत भिंगारे, रोकडे सर, गोविंदजी निकाळजे, अशोक कांबळे, राहुल शेठ कदम, रामचंद्रजी निघते, शंकरराव मारणे, सुनील शिंदे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.