लोणी काळभोर (पुणे) : बारामती-भिगवण रस्त्यावरील हॉटेल अभिषेकसमोर शुक्रवारी (ता. 22) सायंकाळी साडेपाच वाजनेच्या सुमारास झालेल्या अपघातातील, जखमी पोलिस हवालदार संदीप जगन्नाथ कदम (वय 43, रा. बारामती मूळगाव – लासुर्णे ता. इंदापूर) यांचे उपचारादरम्यान अखेर सोमवारी (ता. २५) दुपारी निधन झाले. संदीप कदम यांच्यावर अंत्यसंस्कार लासुर्णे (ता. इंदापुर) येथे आज (सोमवारी) सायंकाळी पाच वाजता वाजता होणार आहेत.
संदीप कदम हे जिल्हा (ग्रामिण) पोलिस दलातील यवत पोलिस ठाण्यात मागील तीन वर्षापासुन कार्यरत होते. संदीप कदम पायी जात असताना, पाठीमागुन आलेल्या एका तीन चाकी टेम्पोने त्यांना जोरदार धडक दिली होती. यामध्ये कदम हे गंभीररित्या जखमी झाले होते. संदीप कदम यांना दोन दिवस पुण्यातील एका बड्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. तर काल (रविवार) दुपार पासुन त्यांच्यावर बारामती शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान आज (सोमवारी) दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली