महाबळेश्वर: तालुक्याचे सुपुत्र मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी येथील दुर्गम भागांच्या विकासाकरिता तब्बल ४७१ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. मात्र, श्रेय याचे श्रेय विद्यमान बिनकामाचे निष्क्रिय आमदार आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी धडपड करीत असल्याची घणाघाती टीका वाई विधानसभा मतदार संघाचे अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांनी केली. तापोळा व कांदाटी येथील गावांना प्रत्यक्ष भेट देत त्यांना नागरिकांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांच्या किटलीचा जोर आता महाबळेश्वर व परिसरात वाढू लागल्याचे पाहिला मिळत आहे.
१५ वर्षे यांच्या नेत्याचे सरकार होते. त्यावेळी यांना निधी मंजूर करता आला नाही. कारण यांच्याकडे विकासाचे कोणतेही व्हिजन नव्हते. गेल्या ५ वर्षात आ. पाटील यांची निष्क्रियता जनतेच्या चांगलीच ध्यानात आली असून, जनता आता त्यांच्या कोणत्याही भूलथापांना बळी पडणार नसून, परिवर्तन घडविण्याच्या मुडमध्ये असल्याचे जाधव यावेळी म्हणाले.
लाभनायक नेत्याचे कारनामे उघडः जाधव
झाडांनी येथे वळवी नामक व्यक्तीकडून ४० एकरात विनापरवाना रिसॉर्ट उभे करण्यात आले. त्याबाबत सामाजिक कार्यकर्त्यांकडून आवाज उठविला जात आहे. स्वतःला जननायक म्हणवून घेणाऱ्या लाभनायकाकडून संबंधित वळवी नामक व्यक्तीवर साधी कारवाईची मागणी सुद्धा केली जात नाही. जनतेचे नाव पुढे करून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी एका धनदांडग्यांचा विकास करण्यासाठी वापरण्याची अवदसा नेमकी कोणी सुचवली, असा प्रश्न जाधव यांनी केला आहे.