भोर ; महिला सर्वांगीण उत्कर्ष मंडळ मासूम संस्थेअंतर्गत जागतिक महिला दिन नसरापूर येथे उत्साहात साजरा करण्यात आला. भोर तालुक्यातील वेगवेगळ्या गावातून २०० महिला कार्यक्रमात उपस्थित होत्या.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भोर पंचायत समितीची महिला संरक्षण अधिकारी मनीषा जाधव,राजगड पोलीस स्टेशनच्या प्रमिला निकम,दक्षता समितीच्या वैशाली झोरे,रेल्वे पोलीस ज्योती गिरंजे व नसरापूर गावच्या सरपंच सपना झोरे उपस्थित होत्या. सूत्रसंचालन वैशाली गिरी गोसावी यांनी केले. प्रस्तावना स्वाती बांदल यांनी केली. मासूम संस्थेविषयी माहिती मालन ताईंनी दिली स्वागत शुभांगी ताई गोळे यांनी केले तसेच नसरापूर संवाद केंद्रा विषयी माहिती मंगल ताईंनी दिली मासूमच्या सहसंयोजक जयश्री नलगे यांनी संविधानातील स्त्रियांच्या हक्कांबद्दलची माहिती सांगितली.
जमीर कांबळे लिखित सत्यशोध या नाटकाचा प्रयोग करण्यात आला. सावित्रीबाई फुले त्यांच्या सहकारी फातिमा शेख व विध्यार्थीनी मुक्ता साळवे यांच्यावर आधारित नाटक शितल यशोधरा, प्रज्ञा गवळी व शर्मिला जोशी यांनी सादर केले.शिक्षण, सत्यशोधक विचारांची गरज हे या नाटकात दाखवले आहे. जातिव्यवस्था व पितृसत्ता जुगारून आपल्या आवडीच्या जोडीदाराबरोबर आंतरजातीय लग्न करणाऱ्या जोडप्यांचा सत्कार करण्यात आला. प्रमिला निकम यांनी आपले विचार मांडताना सांगितले की पालक व मुलांचा संवाद खूप कमी झाला आहे तसेच मुलेही मोबाईलच्या अतिवापराने सायबर क्राईमला बळी पडत आहेत. त्यामुळे मुलांबरोबर संवाद करण्याची गरज आहे. ज्योती गिरंजे यांनी आपले मनोगतामध्ये मुलींनी चांगले शिक्षण घेऊन स्वावलंबी बनले पाहिजेत व नंतर लग्न केले पाहिजे असे मार्गदर्शन केले. वैशाली झोरे यांनी सत्यशोधक समाजाची सध्या खूप गरज आहे यांवर मार्गदर्शन केले. महिलांनी आपल्या हक्काबद्दल जागृत असणे खूप गरजेचे आहे.
महिला संरक्षण अधिकारी मनीषा जाधव यांनीही महिलांना मार्गदर्शन केले. मासूम संस्थेच्या सहसंयोजक जयश्री नलगे यांनी संविधानातील हक्कांसाठी महिलांनी संघटित येण्याची गरज आहे. आज समाजात विद्येची देवता म्हणून सरस्वतीचे पूजन केले जाते.परंतु मुलींना शिक्षणाची संधी तर सावित्रीबाई मुळे मिळाली आहे. महिलांवर होणारी हिंसा हा वैयक्तिक प्रश्न नसून तो सर्वांचा झाला पाहिजे म्हणून आपण हिंसा थांबविण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.आपले मनोगत व्यक्त केले व आभार हे पवनराज पाटील यांनी केले व कार्यक्रमाचा समारोप केला.