भोरः नवसह्याद्री गुरुकुलमध्ये दरवर्षी प्रमाणे यंंदाच्या वर्षी देखील विद्यार्थ्यांसाठी गणेशमूर्ती तयार करणे याविषयीची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेमध्ये पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यानी शाडू मातीपासून वेगवेगळ्या आकाराचे सुबक गणेश मूर्ती साकारले. गणपतीच्या गीतांच्या सूरात दंग होऊन गणपतीचे विविध रुपे विद्यार्थ्यांनी साकारली.
विद्यार्थ्यांना शाळेतून मातीचे गोळे तयार करून दिले होते. विद्यार्थ्यांना यावेळी नैसर्गिक मातीचे महत्व, नैसर्गिक रंग याचे महत्व समजावून सांगण्यात आले. तसेच पर्यावरणपुरक गणेशोत्सव काळाची गरज या विषयी देखील माहिती देण्यात आली. कलाशिक्षक सायली अभिनकर, महेश्वर जाधव यांच्यासह सर्व शिक्षक यावेळी उपस्थित होते. शाळेच्या संचालिका सानवी सुके, मुख्याध्यपिका वर्षा धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेला मुलांचा चांगला प्रतिसाद मिळाला.