पारगांव: (प्रतिनिधी धनाजी ताकवणे)
आजकाल शेतीमध्ये नवनवीन प्रयोग शेतकरी करताना पाहिला मिळत आहेत. तसेच अनेकांनी शेतीमध्ये प्रयोग करुन चांगले उत्पन्न घेतल्याचे दिसून आले आहे. मात्र, त्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि पीकाची जाण असणे अत्यंत गरजेचे आहे. दौंड तालुक्यातील एका शेतकऱ्यांने असाच एक शेतीमध्ये प्रयोग करुन चांगले उत्पन्न घेतले आहे. त्यांनी सात एकर जमिनीवर कपाशीचे पीक घेतले असून, यामुळे जमिनीचा पोत सुधारत असल्याचे शेतकरी विजय शिवरकर यांनी सांगितले आहे. त्यांनी केलेल्या या प्रयोगाचा आढावा राजगड न्यूजचे पारगाव प्रतिनिधी धनाजी ताकवणे यांनी घेतला आहे. त्याचाच हा संपादित अंश
आपल्या कृषिप्रधान देशात शेतकऱ्यांसाठी अनेक शेतीचे तंत्रज्ञान विकसित आहे. शेती मशागती विषयी अनेक शेतकरी तंत्रज्ञान अवलंबिताना पहावयास मिळत आहेत. शेतीमध्ये शेतकरी अनेक पीकाची उपाययोजना करत असतात. काहींना यापासून वारंवार एकच पीक घेतल्यानंतर आणि खताच योग्य मात्रा देऊनही उत्पन्न भेटत नाही. अशाही समस्या पुढे येताना दिसत आहेत. तर यावर अनेक जागरूक शेतकरी या समस्ये विषयी काही उपाययोजनामध्ये बदल करत असतात. या समस्येवर तोडगा म्हणून उदाहरणार्थ शेतीचे उत्पन्नात घट, प्रचंड खर्च करू करूनही आर्थिक हानी आणि शेतीसाठी लागणारा प्रचंड खर्च, उत्पन्नाची मात्र कमी, जमीन नापीक होणे, क्षारपड असणे, जमिनीचा पोत बिघडणे अशी विविध कारणे समोर आल्याने शेतकऱ्याचे उत्पन्न घटत आहे. त्यास आर्थिक हानी सोसावी लागत आहे. परिणामी बँकेचे काढलेली कर्जही देणे भागत नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.अशाच समस्येवर एक उपाय म्हणून पारगाव येथील शेतकरी विजय शिवरकर यांनी शेतीचा बिघडलेला पोत आणि घटलेले उत्पन्न यावर वारंवार एकच पीक न घेता “पुढील चार वर्षे पीक चांगले पीक येण्यासाठी शेतीच्या मशागती बरोबरच शेतीला लागणारे कोणते घटक उपयुक्त आहेत, यासाठी एक कपाशीचे पीक घेऊन हा प्रयोग यशस्वी केला असल्याचे विजय शिवरकर यांनी सांगितल.
“या कपाशीमुळे माझ्या शेतीला दुहेरी फायदा होतो. एक म्हणजे शेतीमध्ये कपाशीच्या मुळांची खोलवर वाढ झाल्याने शेती भुसभुशीत तर होतेच, तसेच पुढील दोन वर्ष ऊस, कांदा या पिकासाठी या कपाशी पिकाचा खूप मोठा फायदा होतो .उत्पन्नही दुप्पट मिळते, पाच महिन्याचे हे पिक या कपाशीला फुल आल्यानंतर त्याला बोंड येतात आणि पांढराशुभ्र कापसाचे उत्पन्न मला मिळते. आणि मला सर्व खर्च जाऊन चांगले उत्पन्न मिळते, पण माझा दुहेरी फायदा ही होतो. त्यामुळे मी जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी मी हा प्रयोग करत असतो आणि तो मी यशस्वी केलेला आहे. त्यामुळे मी पुन्हा या सात एकरामध्ये कपाशी पीक घेऊन माझी जमीन चांगली बनवण्याचा एक यशस्वी प्रयत्न करणार आहे.”
-विजय शिवरकर(शेतकरी)