मुळशीः महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांची सभा पार पडली. या सभेतून अजित पवारांनी विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांच्यावर टीका केली. यानंतर त्यांच्या टीकेला संग्राम थोपटे यांनी प्रतिउत्तर दिले. यामुळे पवार यांच्या वक्तव्यामुळे थोपटे आणि पवार यांच्यात चांगलीच जंपली असल्याचे पाहिला मिळाले. पवारांनी थोपटे यांच्याबद्दल अंगात पाणी असायला हवे, असे विधान केले होते. या विधानाचा संग्राम थोपटे यांनी समाचार घेत माझ्या अंगात किती पाणी आहे, लोकसभेला दाखवून दिले आहे. भोर विधानसभा निवडणुकीत भोरची जनता तुम्हाला पाणी पाजल्याशिवाय राहणार नसल्याचे प्रतिउत्तर थोपटे यांनी पवारांना दिले.
महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा पार पडली. या सभेतून माझा विचाराच्या उमेदवाराला म्हणजेच शंकर मांडेकर यांना संधी देण्याचे आवाहन केले. यावेळी बोलताना अजित पवार यांनी संग्राम थोपटे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले हे एसटी स्टँन्ड आहे की पिक अपचे शेड बारामतीचे एसटी स्टॅन्ड बघा असे अजित पवार यांनी सांगितले. तसेच लोकप्रतिनिधी यांच्या अंगात पाणी असावे लागते त्याचवेळी काम होतात अशी टीका पवार यांनी संग्राम थोपटे यांच्यावर केली. अजित पवारांनी थोपटे यांची नक्कल देखील केली.
लोकप्रतिनिधीची प्रशासनावर वचक असावी लागते. लोकप्रतिनिधी हा खमक्या असायला हवा. महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्या, ५ वर्षांत ५००० कोटी रूपयांचा निधी देण्याचे आश्वासन अजित पवार यांनी यावेळी बोलताना दिले. युतीमधील घटक पक्षांनी मी उमेदवार आहे, असे समजून काम करण्याचे आवाहन पवारांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले. मात्र, या संपूर्ण प्रकरणामुळे पवार आणि थोपटे यांच्यात पवारांनी केलेल्या विधानामुळे जुंपली असल्याचे पाहिला मिळाले.