राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

E-Paper
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
E-Paper
  BREAKING NEWS
संग्राम थोपटेंना सलग तिसऱ्यांदा अपयश;भोर पंचायत समितीवर राष्ट्रवादीची सत्ता, ‘चिठ्ठी’ने ठरला सभापती 1 week ago
“तुम्ही आमच्यावर केसेस करणार मग आम्ही तुम्हाला सोडणार का” उद्योजकाच्या मुलाचे अपहरण… 2 weeks ago
कामथडी पंचायत समिती गणातून मोनिका दशरथ जाधव यांच्यावर जनतेचा विश्वास; निवडणूक रिंगणात विजयाचा निर्धार 1 month ago
संयमी, प्रामाणिक नेतृत्वाला कौल; भोंगवली गणात गणेश निगडे यांना मतदारांची ठाम पसंती, परिवर्तन घडवण्याचा निर्धार 1 month ago
भोंगवली पंचायत समिती गणात राष्ट्रवादीच्या गणेश निगडेंचे पारडे जड 1 month ago
Next
Prev
Home खंडाळा

राज्यातील पशुवैद्यकीय विद्यार्थ्यी बेमुदत संपावर; पशुचिकित्सांची सेवा ठप्प, उपचारासाठी आलेल्या अनेकांना फटका

सहा पशुवैद्यकीय महाविद्यालयांतील जवळपास चार हजार विद्यार्थ्यांचा संपात सहभाग

by Team Rajgad Publication
August 3, 2024
राज्यातील पशुवैद्यकीय विद्यार्थ्यी बेमुदत संपावर; पशुचिकित्सांची सेवा ठप्प, उपचारासाठी आलेल्या अनेकांना फटका
0
SHARES
681
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खंडाळा/शिरवळः राज्यातील सहा पशुवैद्यकीय महाविद्यालयातील जवळपास 4000 विद्यार्थी शुक्रवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत.  संपाच्या काळात या विद्यार्थ्यांनी त्यांच्या महाविद्यालयीन शिक्षण आणि महाविद्यालयांना जोडलेल्या पशु चिकित्सालयांवर बहिष्कार टाकला आहे. परिणामी महाविद्यालयांना जोडलेल्या पशुचिकित्सालयांची सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. राज्य सरकार खाजगी पशुवैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी देत आहे, त्यामुळे भविष्यात बेरोजगारांची नवी फौज सरकारला उभी करायची आहे का? असा संतप्त सवाल संप करणाऱ्या विद्यार्थ्यांनी राज्य सरकारला विचारला आहे. या आंदोलनामुळे पशुचिकित्सालयांची सेवा ठप्प झाली असून, उपचारासाठी आलेल्या अनेकांना या संपाचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

खाजगी संस्थेतील केवळ २५ टक्केच तरुणांना मिळतेय नोकरी

You might also like

संग्राम थोपटेंना सलग तिसऱ्यांदा अपयश;भोर पंचायत समितीवर राष्ट्रवादीची सत्ता, ‘चिठ्ठी’ने ठरला सभापती

“तुम्ही आमच्यावर केसेस करणार मग आम्ही तुम्हाला सोडणार का” उद्योजकाच्या मुलाचे अपहरण…

कामथडी पंचायत समिती गणातून मोनिका दशरथ जाधव यांच्यावर जनतेचा विश्वास; निवडणूक रिंगणात विजयाचा निर्धार

राज्य सरकारने ४५ वर्षांपूर्वी व्यावसायिक शिक्षण संस्था सुरू करण्यासाठी खासगी संस्थांना चालकांना परवानगी दिली. आजही अनेक संस्थांसमोर शिक्षणाच्या गुणवत्तेचे आणि शिक्षकांच्या उपलब्धतेचे मोठे आव्हान उभे आहे. तसेच ‘नॅसकॉम’ सारख्या संस्थांच्या अहवालानुसार अशा खाजगी संस्थांमधून बाहेर पडणारे पदवीधरांपैकी केवळ २५ टक्केच तरुणांना नोकरी मिळत आहेत. औद्योगिक गरजा पूर्ण करण्यासाठी जी गुणवत्ता लागते त्या गुणवत्तेचे शिक्षण दिले जात नाही, असा आक्षेप यापूर्वीच अनेकांनी नोंदविलेला आहे. तो  आजच्या अभियांत्रिकी महाविद्यालीन विद्यार्थ्यांच्या बेरोजगारीतून आणि सध्या ते करत असलेल्या व्यवसायातून दिसत आहे. ५ जुलै २०२४ रोजी महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर यांनी राज्यातील खाजगी पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याबाबत अधिसूचना जारी केली, त्यानुसार पंधरा पेक्षा जास्त शिक्षण संस्थांनी थेट प्राध्यापक भरतीची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र, त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांचे काय, हे गुलदस्त्यातच आहे.

नव्या खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालयांचा घाट कशासाठी?

राष्ट्रीय शेतकरी आयोगाने निर्देशित केल्याप्रमाणे ५,००० पशुधन घटकामागे एक पशुवैद्यकीय पदवीधराची गरज आहे. सध्याच्या घडीला राज्यात एकूण ४,८४७ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. त्यापैकी श्रेणी एक दवाखान्यांवर २,५०० पदवीधर काम करीत आहेत. नवीन नियोजित आकृतिबंधाप्रमाणे अजूनही २,५०० पदवीधरांची गरज राज्य शासनाला लागणार आहे. त्यापेक्षा कितीतरी अधिक संख्येने पशुवैद्यक पदवीधर उपलब्ध असताना नव्या खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालयांचा घाट कशासाठी, असा सवाला यामुळे उपस्थित झाला आहे. घातला जातोय.

इतर राज्यात खाजगी पशुवैद्यकीय महाविद्यालय नाही, मग महाराष्ट्रात का?

देशातील बिहार, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांत एकही खाजगी पशुवैद्यकीय महाविद्यालय नाही. मग महाराष्ट्रात याची खरच गरज आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. देशात केवळ महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे की, ज्या ठिकाणी एकूण पाच शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालये आणि तीन नियोजित (अकोला, जळगाव आणि अहमदनगर) शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालये  कार्यरत आहेत. नियोजित पशुवैद्यकीय महाविद्यालये सुरू न करता खाजगी महाविद्यालये सुरू करण्याची परवानगी देण्याचा उद्देश काय, हा मोठा प्रश्नच आहे. सध्या असलेल्या महाविद्यालयांची प्रवेश क्षमता वाढवून गुणवत्ताधारक पदवीधरांची संख्या सहज वाढवता येऊ शकते. माफसू अंतर्गत असलेल्या पाच पशुवैद्यकीय महाविद्यालयांतून अनेक प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. अतिरिक्त कार्यभारावर सर्व कारभार सुरू आहे. असे असताना या सर्व खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालयांतील प्रवेश प्रक्रिया, परीक्षा याबाबत संनियंत्रण काटेकोरपणे होईल का, हा देखील कळीचा मुद्दा आहे.

गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांवर होतोय अन्याय 

खाजगी पशुवैद्यकीय महाविद्यालय भरमसाठ फी आकारणार, त्यात डोनेशनसारखे प्रकार सर्रास होत असून, यामुळे गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. खासगी पशुवैद्यक महाविद्यालयांतून ‘मुन्नाभाई पशुवैद्यक’ जर मोठ्या प्रमाणात निर्माण झाले, तर येत्या काळात पशुपालकासह पशुधनाचे नुकसान होईल, अशी देखील शक्यता यामुळे व्यक्त करण्यात येत आहे. राज्यातील सर्व पशुवैद्यक महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांमध्ये याबाबतीत प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे. भविष्यात याचा उद्रेक होऊ शकतो. राज्यात सुरू असलेल्या खाजगी इंजिनिअरिंग, वैद्यकीय आणि कृषी महाविद्यालयांची परिस्थिती आणि त्यामधून निर्माण झालेले अनेक प्रश्न पाहता खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालयांबाबतच्या निर्णयाचा राज्य शासनाने फेरविचार करायला हवा. या मागणीासह क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय व महाराष्ट्रातील इतर पाच पशुवैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी बेमुदत संपावर जात आहेत.

खाजगीकरण करून बेरोजगारांची नवी फौज उभी करण्याचा सरकारचा घाट: विद्यार्थ्यांचा आरोप 

राज्यात जवळपास साडेतीन कोटी पशुधन आहे. नियमाप्रमाणे त्यासाठी आवश्यक असलेली सहा हजार सहा पशु चिकित्सकांची गरज पूर्ण होत आहे. तसेच जवळपास साडेदहा हजारांपेक्षा जास्त परवानाधारक पशुचिकित्सक आहेत. असे असताना सरकार खाजगी महाविद्यालयांना परवानगी देऊन पशु वैद्यकीय शिक्षणाचे खाजगीकरण तर करतच आहे, सोबतच भविष्यातील बेरोजगारांची नवी फौजही उभी करणार आहे, असा आरोप या संप करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सरकारवर आहे. अहमदनगर, जळगाव आणि अकोल्यासाठी आधीच सरकारी पशुवैद्यकीय महाविद्यालय मंजूर असतानाही, त्या ठिकाणी महाविद्यालय सुरू केले जात नाहीत. तर दुसऱ्या बाजूला राज्यात 20 ते 25 खाजगी पशुवैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोपही देखील संप करणाऱ्या विद्यार्थ्यांनी केला आहे.

ShareTweetSend
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

संग्राम थोपटेंना सलग तिसऱ्यांदा अपयश;भोर पंचायत समितीवर राष्ट्रवादीची सत्ता, ‘चिठ्ठी’ने ठरला सभापती
भोर

संग्राम थोपटेंना सलग तिसऱ्यांदा अपयश;भोर पंचायत समितीवर राष्ट्रवादीची सत्ता, ‘चिठ्ठी’ने ठरला सभापती

March 9, 2026
“तुम्ही आमच्यावर केसेस करणार मग आम्ही तुम्हाला सोडणार का” उद्योजकाच्या मुलाचे अपहरण…
क्राईम

“तुम्ही आमच्यावर केसेस करणार मग आम्ही तुम्हाला सोडणार का” उद्योजकाच्या मुलाचे अपहरण…

March 3, 2026
कामथडी पंचायत समिती गणातून मोनिका दशरथ जाधव यांच्यावर जनतेचा विश्वास; निवडणूक रिंगणात विजयाचा निर्धार
पुणे

कामथडी पंचायत समिती गणातून मोनिका दशरथ जाधव यांच्यावर जनतेचा विश्वास; निवडणूक रिंगणात विजयाचा निर्धार

February 6, 2026
संयमी, प्रामाणिक नेतृत्वाला कौल; भोंगवली गणात गणेश निगडे यांना मतदारांची ठाम पसंती, परिवर्तन घडवण्याचा निर्धार
ताज्या बातम्या

संयमी, प्रामाणिक नेतृत्वाला कौल; भोंगवली गणात गणेश निगडे यांना मतदारांची ठाम पसंती, परिवर्तन घडवण्याचा निर्धार

February 4, 2026
भोंगवली पंचायत समिती गणात राष्ट्रवादीच्या गणेश निगडेंचे पारडे जड
भोर

भोंगवली पंचायत समिती गणात राष्ट्रवादीच्या गणेश निगडेंचे पारडे जड

February 2, 2026
राष्ट्रवादी उमेदवारांच्या प्रचारासाठी आमदार शंकर मांडेकर मैदानात; भोंगवली–कामथडी गटात आज हाय व्होल्टेज कोपरा सभा
भोर

राष्ट्रवादी उमेदवारांच्या प्रचारासाठी आमदार शंकर मांडेकर मैदानात; भोंगवली–कामथडी गटात आज हाय व्होल्टेज कोपरा सभा

February 2, 2026

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

February 9, 2025
धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

September 17, 2024
राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

September 25, 2024
Breaking News: खेड-शिवापूर टोलनाक्यावर ५ कोटी रुपयांची रोख रक्कम नेणारे वाहन पोलिसांनी पकडले; पकडलेले वाहन सत्तेतील बड्या आमदाराचे? 

Breaking News: खेड-शिवापूर टोलनाक्यावर ५ कोटी रुपयांची रोख रक्कम नेणारे वाहन पोलिसांनी पकडले; पकडलेले वाहन सत्तेतील बड्या आमदाराचे? 

October 21, 2024

Bhor Newsसावधान!!हवामान खात्याचा अतिवृष्टीचा इशारा ,पुन्हा एकदा शाळांना सुट्टी जाहीर.

0

पहिल्या वेतनाच्या रकमेतून बालचमुंना दाखविला “डंका हरिनामाचा” सिनेमा

0

Bhor News सावधान||भोर तालुक्यातील वरंधा घाट माथ्यावर अतिवृष्टी,या भागातील धानवली गावातील नागरिकांचे स्थलांतर

0

Bhor Breaking News पसुरेत वीजेच्या खांबावरून घसरून वायरमन जखमी

0
संग्राम थोपटेंना सलग तिसऱ्यांदा अपयश;भोर पंचायत समितीवर राष्ट्रवादीची सत्ता, ‘चिठ्ठी’ने ठरला सभापती

संग्राम थोपटेंना सलग तिसऱ्यांदा अपयश;भोर पंचायत समितीवर राष्ट्रवादीची सत्ता, ‘चिठ्ठी’ने ठरला सभापती

March 9, 2026
“तुम्ही आमच्यावर केसेस करणार मग आम्ही तुम्हाला सोडणार का” उद्योजकाच्या मुलाचे अपहरण…

“तुम्ही आमच्यावर केसेस करणार मग आम्ही तुम्हाला सोडणार का” उद्योजकाच्या मुलाचे अपहरण…

March 3, 2026
कामथडी पंचायत समिती गणातून मोनिका दशरथ जाधव यांच्यावर जनतेचा विश्वास; निवडणूक रिंगणात विजयाचा निर्धार

कामथडी पंचायत समिती गणातून मोनिका दशरथ जाधव यांच्यावर जनतेचा विश्वास; निवडणूक रिंगणात विजयाचा निर्धार

February 6, 2026
संयमी, प्रामाणिक नेतृत्वाला कौल; भोंगवली गणात गणेश निगडे यांना मतदारांची ठाम पसंती, परिवर्तन घडवण्याचा निर्धार

संयमी, प्रामाणिक नेतृत्वाला कौल; भोंगवली गणात गणेश निगडे यांना मतदारांची ठाम पसंती, परिवर्तन घडवण्याचा निर्धार

February 4, 2026

Recent News

मुख्य संपादिका - वर्षा गायकवाड-सोनवणे
+91 7719020202
rajgadnews@gmail.com

URN : UDYAM-MH-26-0239825

Copyright © 2026 राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.) | Powered by राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क www.rajgadnews.live ‘राजगड न्युज’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. Copyright:  लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
About us
Privacy Policy
Grievance Redressal Policy
Fact Checking Policy

Add New Playlist

error: Content is protected !!
No Result
View All Result

Copyright © 2023 Rajgad news.live