मेरठः उत्तरप्रदेश राज्यातील मेरठ शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका झोपडीबाहेर असणाऱ्या अवघ्या दोन महिन्यांच्या मुलीचे अपहरण करण्यात आले असून, दुसऱ्या दिवशी या मुलीचा मृतदेह एका नाल्यात मिळून आला आहे. या ठिकाणच्या एका हॅाटेलमध्ये मोइश (पूर्ण नाव माहित नाही) नावाचा व्यक्ती नोकरी करीत आहे. याच व्यक्तीने मृत मुलीचे अपहरण केले आहे. या अपहरणाचा व्हिडिओ रस्त्याच्या कडेला असणाऱ्या सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाला आहे. अपहरणानंतर दुसऱ्याच दिवशी या मुलीचा मृतदेह एका नाल्यात मिळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
रात्रीचा फायदा घेत केले अपहरण
मोइश नामक व्यक्तीने रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत एका झोपडीच्या बाहेर असलेल्या दोन वर्षांच्या मुलीला तिथे कोणीही नसल्याने अलगद कोणाही कळणार अशा पध्दतीने अपहरण केले आहे. या नराधमाचा शोध मेरठ पोलिसांनी लावला असून, त्या ताब्यात घेतले आहे. या मुलीचे अपहरण याच व्यक्तीने केले असल्याचे दिसून येते. मात्र, तिचा खून त्याने केला आहे की नाही ही माहिती अद्यापर्यंत मिळू शकलेली नाही. तसेच या व्यक्तीने मयत मुलीचे अपहरण कोणत्या कारणासाठी केले याचा देखील उलघडा अद्यापर्यंत होऊ शकलेला नाही. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
अपहरण कर बच्ची की हत्या –
मेरठ, यूपी में रेस्टोरेंट पर काम करने वाला मोइश रात के अंधेरे में झोंपड़ी के बाहर सो रही 2 साल की परी को उठाकर ले गया। सुबह बच्ची की लाश नाले में मिली। आरोपी मोइश अरेस्ट है। pic.twitter.com/yCLUhoutVc
— Sachin Gupta (@SachinGuptaUP) August 17, 2024