भोरः आजच्या स्पर्धात्मकतेच्या युगामध्ये अनेक उत्पादने बाजारात रास्त दरामध्ये उपलब्ध आहेत. असे असले तरी उत्पादनांची गुणवत्ता देखील उत्तम दर्जाची असणे अत्यंत महत्वाचे आहे. गेल्या ३५ वर्षांपासून CRI wires and cables ही मल्टीनॅशनल कंपनी ग्राहकांचा विश्वास संपादित करण्यात पात्र ठरली आहे. या कंपनीची वायर अँन्ड केबलची डिस्ट्यूब्युटर कंपनी इन्फ्रा व्हिजरी कन्सटन्सी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असून, या कंपनीने येथील वायरमन, इलेक्ट्रिशन आणि विक्रेत्यांकरिता मिटींगचे आयोजन केले होते. या बैठकीमध्ये सागर इलेक्ट्रिकल, सानिका इलेक्ट्रिकल, वर्धराज इंजिनअर्स आदी विक्रेत्यांनी सहभाग नोंदविला.
या बैठकीमध्ये कंपनीचे मालक व पुणे जिल्हा परिषदेचे मा. सभापती चंद्रकांत बाठे यांनी उपस्थितांना घरातील हाऊसिंग वायर आणि केबलविषयी तांत्रिक माहिती दिली. तसेच कंपनीचे सेल्स अँन्ड मार्केटिंग मॅनेजर मंगेश कासार आणि महाराष्ट्र वीज महामंडळ किकवी शाखा अभियंता पठाण शेट्टी यांनी वायरिंगची माहिती दिली. या बैठकीला विक्रेत्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला. या बैठकीत महाराष्ट्र वीज महामंडळ शाखा अभियंता किकवी पठाण शेठ्ठी, सुनिताताई बाठे (मा. सभापती पंचायत समिती भोर), चंद्रकांत बाठे (मा. सभापती जिल्हा परिषद पुणे), कंपनीचे सेल्स अँन्ड मार्किटिंग मॅनेजर मंगेश कासार, पत्रकार जीवन सोनवणे, पत्रकार दिपक महांगरे, संदिप नेवसे, निलेश तारु, वासुदेव बाठे आदी उपस्थित होते.
गेल्या २० वर्षांपासून ग्राहकांच्या सेवेत
CRI wires and cables ही मल्टीनॅशनल कंपनी असून, गेल्या ३५ वर्षांपासून पंप, मोटर आणि सबसेबल कॅापर केबल या सेक्टरमध्ये काम करीत आहे. या कंपनीचे ग्रामीण भागात मोठे नावलौकिक असून, ग्राहकांची पहिली पसंत म्हणून या कंपनीकडे पाहिले जाते. २० वर्षांपासून घरातील हाऊसिंग वायरची निर्मिती करीत आहे. त्यांच्या उत्पादनाला मार्किटमध्ये ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.