पुणे : राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असल्याचे पाहिला मिळत आहे. त्यादृष्टीने तयारीला देखील सुरुवात झाल्याचे दिसते. जिल्ह्यात २१ विधानसभेचे मतदार संघ येतात. यापैकी शिवसेना पक्षाने सहा मतदार संघाची आपला दावा सांगत तशी मागणी केली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. यापैकी पुरंदर, जुन्नर आणि हडपसर विधानसभा क्षेत्रामध्ये शिवसेनेचे ताकद चांगली असल्याचे समजते.
या पार्श्भूभूमीवर पुरंदरमध्ये माजी मंत्री विजय शिवतारे, हडपसरला पुणे शहरप्रमुख प्रमोदनाना भानगिरे, भोर-वेल्हामध्ये कुलदीप कोंडे आणि बाळासाहेब चांदेरे, जुन्नरला माजी आमदार शरद सोनवणे, खेड-आळंदी मतदारसंघातून भगवान पोखरकर आणि नितीन गोरे हे इच्छूक आहेत. यापैकी पुरंदरमधून विजय शिवतारे यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. असे बोलले जात आहे. त्या दृष्टीने माजी राज्यमंत्री राहिलेल्या शिवसेनेच्या विजय शिवतारे यांनी पुरंदर मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. ते सलग दोन वेळा या मतदार संघातून निवडून आले होते. मात्र २०१९ च्या निवडणुकीत विजय शिवतारे यांचा काँग्रेसचे संजय जगतापांनी पराभव केला होता. त्यानंतर विजय शिवतारे राजकारणातून बरेच दूर गेल्याचे दिसून आले. परंतु, लोकसभा निवडणुकीत विजय शिवतारे यांनी आक्रमक भूमिका घेत महायुतीच्या नेत्यांची चांगलीच धांदल उडवून दिली होती. अखेर मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या चर्चितनंतर त्यांनी अजित पवार गटातील उमेदवार सुनेत्रा पवारांना यांना पाठिंबा दिला होता.
पक्षाची संघनात्मक उत्तमप्रकारची कामगिरी आ. संजय जगताप यांनी केली आहे.
पुरंदर विधानसभा मतदारसंघावर दोन टर्म विजय शिवातारे यांचे वर्चस्व राहिलेले होते. २०१९ च्या निवडणुकीत हा मतदार संघ काँग्रेसच्या तब्याबत आला. मागील पाच वर्षात आमदार संजय जगताप यांनी तो चांगला प्रकारे बांधून ठेवला आहे. पक्षाचे चांगल्या प्रकारे संघटन करताना जगताप दिसत आहेत. काँग्रेस पक्षाचे नाव मतदारांपुढे कसे चांगले राहील, यासाठी जे-जे काही करता येईल, त्या दृष्टीने ते विशेष लक्ष देत आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्षाकडून त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. तर दुसऱ्या बाजूला विजय शिवतारे यांच्या नाव जवळपास फायनल झालंय.
महायुतीचा धर्म म्हणून विजय शिवतारेंनी घेतली होती माघार
महायुतीमध्ये अजित पवार सामील झाल्याने पुरंदरमध्ये विजय बापू शिवतारे यांना मोठी ताकद मिळणार असल्याचे दिसते आहे. लोकसभा निवडणुकीत विजय शिवतारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु, अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या चर्चेनंतर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. यामुळे या निवडणुकीत विजय शिवतारे यांना अजित पवारांची देखील ताकद मिळणार आहे. शिवातारे यांचे तगडे आव्हान संजय जगताप यांच्या पुढे असणार यात शंका नाही.