नसरापूर: अनंत निर्मल चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने नसरापूर व परिसरातील महिलांसाठी आयोजित मोदक बनविण्याच्या प्रशिक्षण कार्यक्रमात महिलांनी उत्साहाने आपला सहभाग नोंदविला. जिल्हा परिषद शाळा, नसरापूर येथे आयोजित या कार्यक्रमात महिलांना विविध प्रकारचे मोदक कसे बनवायचे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी महिलांनी स्वतःहून मोदक तयार करून आपल्या कौशल्यांचा प्रत्यक्षात परिचय दिला. या प्रशिक्षण कार्यक्रमात महिलांना विविध प्रकारचे मोदक बनविण्याची पद्धत शिकवण्यात आली. यात पारंपरिक मोदकांसह नवीन प्रकारचे मोदक बनविण्याचेही मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी उपस्थित महिला भगिनींनी प्रशिक्षण देणाऱ्या ताईंचा सन्मान करत त्यांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास भोर तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्षा गितांजली शेटे, नंदा जाधव, नसरापुरच्या सरपंच स्वप्ना झोरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष महिलाध्यक्ष विद्या जाधव, जिल्हा युवती अध्यक्ष दुर्गा चोरघे, मा. सरपंच रोहिणी शेटे, ज्योती चव्हाण, शीला साळेकर, तनिष्का महिला ग्रृप, भोर तालुका अध्यक्ष वैशाली झोरी, ग्रा.पं.सदस्या अश्विनी कांबळे, उषा कदम, कविता हाडके, उपसरपंच नसरापूर सुधीर वाल्हेकर, ग्रा.पं.सदस्य इराफान मुलाणी यांच्यासह मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या.
प्रशिक्षणामुळे नवीन कौशल्य शिकण्याची संधी
या कार्यक्रमात महिलांनी उत्साहाने भाग घेतला. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांना नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळाल्याबद्दल आयोजकांचे सर्व महिलांनी आभार मानले. या प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम महिलांना स्वावलंबी बनविण्यात मदत करतात. तसेच ते समाजात एकता निर्माण करण्यासही मदत करतात. यासाठी अनंत निर्मल चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित या कार्यक्रमासाठी महिलांनी आयोजकांचे आभार मानले.