Tuesday, July 14, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

‘त्या’ घटनेच्या निषेधार्थ वरवे गावात कडकडीत बंद; येथून पुढे अनोळखी व्यक्तींना गावात थारा नाही, पंतप्रधानांना लिहिले पत्र, आरोपीला कठोर शिक्षेची केली मागणी 

महिला, युवती आणि ग्रामस्थांचा बंदमध्ये उस्फुर्त सहभाग

by SBPRNL
September 26, 2024
‘त्या’ घटनेच्या निषेधार्थ वरवे गावात कडकडीत बंद; येथून पुढे अनोळखी व्यक्तींना गावात थारा नाही, पंतप्रधानांना लिहिले पत्र, आरोपीला कठोर शिक्षेची केली मागणी 

नसरापूरः गेल्या काही दिवसांपूर्वी भोर तालुक्यातील पुणे-सातारा महामार्गालगत असलेल्या एका गावात दोन वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचाराची संतापजनक घटना घडली होती. या प्रकरणामुळे संतापाची धग अजूनही पेटत आहे. या घटनेच्या निषेधार्थ वरवे गावातील महिला आणि ग्रामस्थांनी एकत्र येत गावासह दुकाने बंद ठेऊन या घटनेचा तीव्र निषेध नोंदविला आहे.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

सकाळी गावातील सर्व जेष्ठ मंडळी, तरुण वर्ग महिला आणि युवती मोठ्या संख्येने या बंदमध्ये सहभागी झाल्याचे पाहिला मिळाले. यानंतर महिला व ग्रामस्थांनी छत्रपती संभाजी महाराज स्मारक येथे एकत्रित येत अभिवादन केले. संपूर्ण गावातून महिला व युवतींनी निषेध रॅली काढून अत्याचाराच्या घटनेचा निषेध व्यक्त केला. यावेळी बदलापूरच्या धर्तीवर आरोपीला शिक्षा देण्याची मागणी ग्रामस्थ, महिला तरुणींच्या वतीने करण्यात आली.

येथून पुढे अनोळखी व्यक्तीला गावात थारा नाही

गावात भाडोत्री राहत असलेल्या बाहेरील व्यक्तींकडून अशी घटना घडल्याने नाहक गाव बदनाम होत आहे. येथून पुढे बाहेरील व्यक्तीची सर्व माहिती असल्याशिवाय त्याला गावात थारा देऊ नये, अशी मागणी यावेळी महिलांच्या वतीने करण्यात आली.

आरोपीला फाशीच द्या 

माणुसकीला काळिमा फासणारी आणि अतिशय निंदनीय घटना घडली आहे. यामुळे परिसरातील गावामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पिडीतेला न्याय मिळाला पाहिजे तसेच या घटनेतील आरोपीला अल्पवयीन न समजता त्याला इतर आरोपीप्रमाणे फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी यावेळी बोलताना महिलांनी केली.

आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, महिलांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र

या घटनेतील १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने लैंगिक अत्याचार करून पिडीत कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्याला अज्ञान न समजता आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी करणारे लेखी पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वरवे गावातील महिलांनी लिहिले आहे.

Tags: Bhorcrimnewsrajgadnewssatara
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post
धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

खळबळजनक! तीन वर्षांची चिमुरडी घरात एकटी असल्याचे पाहून घरात घुसून अत्याचार, १४ वर्षीय मुलाला पोलिसांनी घेतले ताब्यात

ताज्या बातम्या

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

July 8, 2026
शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

July 4, 2026
भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

July 3, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group