Thursday, June 11, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

नसरापूर: भविष्यातील विकास कामांसाठी प्रयत्नशील: संग्राम थोपटेंची ग्वाही

आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे यांच्या गावभेट दौऱ्याला नागरिकांचा मिळतोय उस्फूर्त प्रतिसाद

by SBPRNL
November 14, 2024
नसरापूर: भविष्यातील विकास कामांसाठी प्रयत्नशील: संग्राम थोपटेंची ग्वाही

नसरापूर: महाआघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे यांनी  येथील नागरिकांशी गाव भेट दौऱ्याच्या निमित्ताने संवाद साधला. केलेल्या विकास कामांची माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली. तसेच संग्राम थोपटे यांनी यावेळी नागरिकांसोबत मुक्त संवाद साधत त्यांच्या अडचणी देखील समजून घेतल्या. यावेळी नसरापूर येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

नसरापूर आणि आसपासच्या ठिकाणी विस्तारीकरणामुळे या ठिकाणी जागेची उपलब्धता ही कमी होत चाललेली आहे. या अगोदर केलेली अनेक विकास कामे माहिती पुस्तकाच्या माध्यमातून सांगितली आहे. प्रलंबित असलेली विकासकामे करण्याकरिता प्रयत्न करणार असल्याची ग्वाही यावेळी थोपटे यांनी बोलताना दिली.

यावेळी राजगडचे संचालक के. डी. सोनवणे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष रवींद्र बांदल, मानसिंग धुमाळ, माजी सभापती लहूनाना शेलार, शिवाजी कोंडे, नसरापूरचे उपसरपंच सुधीर वाल्लेकर, खरेदी विक्री संघाचे माजी संचालक ज्ञानेश्वर झोरे, इरफान मुलाणी, गणेश दळवी, महेश दळवी, शंकर शेटे, माऊली पांगारे, सोमनाथ सोमाणी, निखिल डिंबळे, विशाल डिंबळे, निलेश भोरडे, अनिल शेटे, संदीप कांबळे, माऊली चव्हाण, रमेश शिळीमकर, मदन खुटवड, बापू जगताप आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

नसरापूर येथील अनेकांनी थोपटे यांना पाठिंबा दर्शवला असून या ठिकाणची आरोग्य व्यवस्था, इमारत आधी प्रलंबित कामांसाठी सदैव प्रयत्नशील असणार असल्याचे त्यावेळी म्हणाले. 13 कोटी रुपयांची पाण्याची योजना सुरू करण्यात आली. टाकीची क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असून अधिक दाबाने पाणीपुरवठा गावातील नागरिकांना देण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्य रस्त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्या कामासाठी निधी देण्यात आला. परंतु पावसामुळे रस्ता खचून गेला आहे. बनेश्वर येथील मुख्य रस्त्याचे काम करणे गरजेचे असून बनेश्वर केळवडे रस्ताच्या डांबरीकरणाचे काम केले आहे. गावाला पर्याय रस्ता उपलब्ध करून देण्यात आला आहे. या ठिकाणची बाजारपेठ टिकली आणि वाढली पाहिजे, असा प्रामाणिक हेतू असल्याचे त्यांनी सांगितले.

चेलाडी येथे अत्याधुनिक आरोग्य केंद्राची निर्मिती

चेलाडी येथील पशुसंवर्धन विभागाच्या 40 गुंठे जागेत सुनील केदार हे मंत्री असताना ती जागा जिल्हा परिषदच्या नावावर वर्ग करण्यात आली असून त्या ठिकाणी अत्याधुनिक प्रकारचे आरोग्य केंद्राची निर्मिती होणार असल्याची माहिती थोपटे यांनी दिली. त्यासाठीचा ॲक्शन प्लॅन देखील तयार असल्याचे ते म्हणाले.

‘या’ उमेदवाराने दिला संग्राम थोपटे यांना जाहीर पाठिंबा

राजगड तालुक्यातील माणगाव येथील सैनिक समाज पार्टीचे उमेदवार अनिल संभाजी जगताप यांनी भोर विधानसभेचे आघाडीचे उमेदवार  आमदार संग्राम थोपटे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. शिवराज शेंडकर, विकास पासलकर, जितेंद्र साळुंके, राजेंद्र कडू, नानासाहेब राऊत , गणेश जागडे यांच्या प्रयत्नातून अनिल जगताप यांनी थोपटे यांना पाठिंबा जाहीर केला. यामुळे संग्राम थोपटे यांनी जगताप यांचे आभार मानले

Tags: Bhormlasangramthopaterajgadnews
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post
सत्ताकारणः विनोद तावडे यांनी केलेल्या मुख्यमंत्रीपदाच्या ‘सूचक’ विधानानंतर फडणवीस यांचं मुख्यमंत्री पदाबाबात ‘मोठं’ विधान!

सत्ताकारणः विनोद तावडे यांनी केलेल्या मुख्यमंत्रीपदाच्या 'सूचक' विधानानंतर फडणवीस यांचं मुख्यमंत्री पदाबाबात 'मोठं' विधान!

ताज्या बातम्या

विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

June 9, 2026
भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

June 8, 2026
राजगड पोलीस ठाण्याला नवे पोलिस निरीक्षक; संतोष जाधव यांची नियुक्ती, राजेश गवळी यांची पुणे ग्रामीणमध्ये बदली

राजगड पोलीस ठाण्याला नवे पोलिस निरीक्षक; संतोष जाधव यांची नियुक्ती, राजेश गवळी यांची पुणे ग्रामीणमध्ये बदली

June 8, 2026
केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

June 7, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group