भोर: वेळवंड खोऱ्यातील गावांना अनंत निर्मल चारिटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष स्वरुपा थोपटे यांनी भेट देत नागरिकांशी संवाद साधला. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणायचे आहे.त्यामुळे आपल्या हक्काचा माणूस आमदार संग्राम थोपटे यांच्या सोबत राहण्याचे आवाहन स्वरुपा थोपटे यांनी नागरिकांना केले. महाविकास आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे यांच्या प्रचार दौऱ्यात स्वरुपा थोपटे। येथील गावात बोलत होत्या.
त्यांच्या नेतृत्वाखाली पसुरे, कर्नवडी, म्हळवडी बारेबु, बारेखु बसरापुर किवत,भोलावडे या गावांना भेट दिली. यावेळी गितांजली शेटे, वंदना धुमाळ, सुर्वणा मळेकर, सरिता दानवले, सुनंदा दानवले, मंगल लेकावळे, सविता दानवले, सुनिल धुमाळ, राजेंद्र धुमाळ, माऊली दानवले, विजय धुमाळ, जयसिंग तुंगतकर व नागरिक उपस्थित होते.
मागच्या तीन निवडणुका आमदार थोपटे यांनी जिंकल्या असुन, ही त्यांची चौथी निवडणूक आहे. शेतकऱ्यांना तीन लाख कर्जमाफी महिलांना मोफत बस, सेवा महिलांना महिन्याला तीन हजार, २५ लाख विमा दिला जाणार आहे. युतीचे सरकार काळात महागाई मोठ्या प्रमाणात वाढली असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. थोपटे यांच्या माध्यमातून प्रत्येक गावात निधी दिला आहे, त्यामुळे विकासाच्या मागे आपल्या हक्काच्या माणसाबरोबर राहा, असे देखील त्या यावेळी म्हणाल्या.