पुणेः मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण(mukhyamantrimaziladakibahin)योजनेच्या लाभार्थी महिलांना लाभाची रक्कम अदा करण्याच्या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल बालेवाडी येथे कार्यक्रमाचे आयोजन केले असून, ज्या महिलांनी हा फार्म भरला आहे आणि त्यांना अपरूव्हूड चा मेसेज आला आहे. त्यांंनी या कार्यक्रमाला हजर राहावे. कार्यक्रमाला पोहचण्यासाठी महापालिकेच्या वतीने बसची व्यवस्था सुखसागर पोलीस चौकी येथून करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला हजर राहण्यासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे. सर्वांनी येणे आवश्यक आहे. ज्या महिला येणार नाहीत त्यांचा फार्म रद्द करण्यात येईन, असा आशय असणारा एक मेसेज खासदार सुप्रिया सुळे यांनी एक्सवर ट्विट केला आहे.
तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या रक्कम अदा करण्याच्या कार्यक्रमाला हजर न राहणाऱ्या बहिणींचे फॉर्म रद्द करण्याचे धमकी देणारे हे स्वतःला ‘भाऊ’ म्हणवितात आहेत. बहिणीला कार्यक्रमाला बोलाविणार आणि त्यांची गर्दी दाखवून स्वतःची पाठ थोपटून घेणार. अरे सत्तेत बसलेल्या भावांनो, ‘बहिण-भावाचं’ नातं एवढं स्वस्त नसतं. बहिणींना प्रेमानं काही मागितलं तर बहिण त्याला नाही म्हणत नाही. पण तिला धमक्या देऊ लागलात तर ती कुणालाच घाबरत नाही हे लक्षात ठेवा. हिंमत असेल तर या कार्यक्रमाला न जाणाऱ्या एकातरी बहिणीचा फॉर्म रद्द करुन दाखवाच. असे प्रतिउत्तर सुळे यांनी एक्सवर पोस्ट करीत दिले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या रक्कम अदा करण्याच्या कार्यक्रमाला हजर न राहणाऱ्या बहिणींचे फॉर्म रद्द करण्याचे धमकी देणारे हे स्वतःला 'भाऊ' म्हणवितात आहेत… बहिणीला कार्यक्रमाला बोलाविणार आणि त्यांची गर्दी दाखवून स्वतःची पाठ थोपटून घेणार… अरे सत्तेत बसलेल्या भावांनो,… pic.twitter.com/lRiUz3e1Kv
— Supriya Sule (@supriya_sule) August 17, 2024