Monday, June 8, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

सुपा पोलिसांची कामगिरीः मंदिरातील चोरी करणाऱ्या आरोपींच्या सिनेस्टाईने पाठलाग करीत आवळल्या मुसक्या

आणखी गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता: पोलिसांची माहिती

by Team Rajgad Publication
September 19, 2024
सुपा पोलिसांची कामगिरीः मंदिरातील चोरी करणाऱ्या आरोपींच्या सिनेस्टाईने पाठलाग करीत आवळल्या मुसक्या

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,

सुपाः पुणे व सातारा जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रात्रीचा फायदा घेत अनेक चोरीच्या घटना घडल्या होत्या. या घटनेतील आरोपींच्या मागावर पोलीस होते. या प्रकरणी सुपा पोलिसांनी धकाडेबाज कामगिरी करीत एकूण ४ आरोपींना अटक केली असून, यातील एक आरोपी अल्पवयीन आहे. आरोपींकडून पोलिसांनी १५ लहान-मोठ्या घंटा, १ पानेश्वर देवाची मुर्ती, २ मुकुट, २ समई, १ पंचार्थी असा माल हस्तगत करण्यात आला आहे.

पुणे ग्रामीण जिल्ह्यातील तसेच शेजारील सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मंदिरात चोरीच्या अनेक घटना घडलेल्या होत्या. सदरच्या चोऱ्या या मंदिरात होत असल्याने व तो लोकांच्या भावनेचा आणि श्रध्देचा विषय असल्याने सदरचे आरोपी हे अटक करणे हे एक मोठे आव्हान असल्याचे पोलिसांनी सांगितले.

रस्त्याच्याकडेला संशियितरित्या थांबलेल्या गाडीमुळे आरोपींचा लागला छडा 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १६ सप्टेंबर रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक नवसरे यांनी रात्रगस्ती असणारे अंमलदार यांना  रात्रगस्त करुन मंदिरात चोऱ्या होवू नयेत, या करिता पोलीस स्टेशनचे अमंलदार सचिन दरेकर व सागर आशोक वाघमोडे यांना सूचना दिल्या होत्या. रात्रगस्ती दरम्यान दंडवाडी गावच्या हद्दीत एक मारूती सुझुकी कंपनीची अल्टो ८०० कार ही रस्त्याच्या कडेला नंबर प्लेटवर चिखल लावून संशईतरित्या थांबलेली पोलिसांना दिसली. रात्रगस्त अंमलदार हे सदर गाडीजवळ जाताच गडीतील इसमाने सदरची गाडी वेगात सुपे बाजूकडे घेवून गेला.

पोलिसांनी पाठलाग करुन आरोपींना घेतले ताब्यात

त्याचवेळी शेजारीच असलेल्या विठ्ठल मंदिरातील दोन अनोळखी इसम हे त्या ठिकाणाहून अंधारात पळून गेले. त्यावेळी रात्रगस्त अंमलदार यांनी सदर घटनेची माहिती तात्काळ रात्रगस्तसाठी असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे यांना दिली. ते तात्काळ स्टाफसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी कार घेऊन पळालेल्या इसमाचा पाटलाग करुन त्यास लोणंद जि. सातारा येथून ताब्यात घेतले. तसेच अंधाराचा फायदा घेऊन पळालेल्या इसमांना देखील पोलिसांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.

आणखी गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता 

याप्रकरणी पोलिसांनी ओंमकार शशिकंत सांळुखे (रा. आनंदपुर ता. वाई जि. सातारा सध्या रा. शिरवळ पंढरपुर फाटा ता. खंडाळा जि.सातारा), तुषार अनिल पवार (रा. दत्तनगर सांगवी रोड ता. खंडाळा जि.सातारा) सौरभ दत्तात्रय पाटणे रा. शिरवळ ता. खंडाळा जि.सातारा व एक अल्पवयीन बालक अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींनी  वाई, राजगड, लोणंद, सातारा, जेजुरी व इतर ठिकाणी सदर प्रकारचे गुन्हे केल्याबाबत सांगत असल्याने तेथील गुन्हेही उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

सदरची कामगिरी  पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक गणेश बिरादार, उपविभागिय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे, कुलदिप संकपाळ, जिनेश कोळी, सहा. फौजदार कारंडे, पो. हवा. रुपेश साळुंके, राहुल भाग्यवंत, संदिप लोंढे, विशाल गजरे, अनिल दनाणे अभिजीत एकशिंगे, स्वप्नील अहिवळे, विनोद पवार, पो. कॉ. सचिन दरेकर, सागर वाघमोडे, संतोष जाविर, तुषार जैनक, महादेव साळुंके, किसन ताडगे, रुषीकेश विर, होमगार्ड शिवतारे यांनी केली आहे.

Tags: crimenewsPunerajgadnewsroberysatara
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,
क्राईम

संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,

July 18, 2025
पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची नवी प्रभाग रचना आज जाहीर होणार
पुणे

पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची नवी प्रभाग रचना आज जाहीर होणार

July 14, 2025
ताज्या बातम्या

Rajgad News बातमी इफेक्ट- भोलावडेच्या पृथ्वीराज पेट्रोल पंपाजवळच्या रस्त्यावरील खड्डा बुजविला 

June 26, 2025
8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर
क्राईम

8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर

February 15, 2025
Next Post
Breaking News: खेड-शिवापूर टोल नाक्याजवळ एसटीच्या चालक, वाहकाला टोळक्याकडून बेदम मारहाण; मुलगी रडली नसती तर त्यांनी…..

Breaking News: खेड-शिवापूर टोल नाक्याजवळ एसटीच्या चालक, वाहकाला टोळक्याकडून बेदम मारहाण; मुलगी रडली नसती तर त्यांनी.....

ताज्या बातम्या

केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

June 7, 2026
भोर तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई केव्हा? की संगनमत?

भोर तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई केव्हा? की संगनमत?

June 6, 2026
भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
राजकारणातील भीष्मपितामहाला अखेरचा निरोप; मा. मंत्री अनंतराव थोपटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

राजकारणातील भीष्मपितामहाला अखेरचा निरोप; मा. मंत्री अनंतराव थोपटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

June 5, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group