Sunday, July 12, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

राज्यस्तरीय ‘राजकुमार काळभोर मराठी साहित्य संमेलन’ संपन्न; कवी-कवयित्रींनी सादर केल्या बहारदार काव्यरचना

शोषितांच्या, वंचितांच्या, स्त्रियांच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या मुळाशी जाणे हे साहित्यिकांचे विचार: अध्यक्ष शरद गोरे

by SBPRNL
August 5, 2024
राज्यस्तरीय ‘राजकुमार काळभोर मराठी साहित्य संमेलन’ संपन्न; कवी-कवयित्रींनी सादर केल्या बहारदार काव्यरचना

लोणी काळभोर: प्रतिनिधी ज्ञानेश्वर शिंदे

माणसांचे गुणगान गाणारे, माणसे समृद्ध करणारे आणि माणसांना आत्मभान देणारे विचार साहित्यिक आणि विचारवंतांनी दिले पाहिजे. विचारांना कोणतीही सीमा न ठेवता ते विचार वैश्विक असले पाहिजेत. प्रत्येक माणसाला ते विचार आपले वाटणारे असावेत. शोषितांच्या, वंचितांच्या, स्त्रियांच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या मुळाशी जाणे हे साहित्यिक आणि विचारवंतांचे लक्षण असते, असे प्रखड विचार अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे यांनी व्यक्त केले. स्वर्गीय राजकुमार काळभोर यांच्या जयंती निमित्ताने घेण्यात आलेल्या तिसऱ्या राज्यस्तरीय राजकुमार काळभोर मराठी साहित्य संमेलन महात्मा फुले सभागृह वानवडी येथे आयोजित केले होते.

You might also like

लोणी काळभोरः रिक्षाचालकाकडून आठवीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार; रिक्षाचालकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

या संमलनाचे उद्घाटक शरद गोरे, स्वागताध्यक्ष किशोर टिळेकर, संमेलना अध्यक्ष वसुधा नाईक, पुणे विभागीय अध्यक्ष आणि निमंत्रक सूर्यकांत नामुगडे, राष्ट्रीय उपाध्यक्षा शुभांगी काळभोर, शिवसेना जिल्हा संघटक निलेश काळभोर, प्रा. सुरेश वाळेकर, ज्ञानेश्वर धायरीकर, नानाभाऊ माळी, फुलचंद नागटिळक, मधुकर गिलबिले आणि साहित्य सम्राटचे संस्थापक अध्यक्ष विनोद अष्टुळ आदी मान्यवर मंचावर यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वर्गीय राजकुमार काळभोर यांच्या प्रतिमेचे आणि भारतीय संविधानाचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर समाजातील विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱ्या गुण कौशल्य धारकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. चित्रकार बजरंग पवार यांनी काढलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या छायाचित्राचे अनावरण, तसेच कवयित्री सिंधू साळेकर यांच्या कस्तुरी गंध या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या राज्यस्तरीय संमेलनासाठी राज्यातील बुलढाणा, सातारा, बारामती, मुंबई, नाशिक, राजगुरुनगर, रायगड, भोर, सोलापूर आणि पुणे अशा विविध शहरातून कवी-कवयित्रींनी उत्स्फूर्तपणे आपल्या बहारदार काव्यरचना सादर करून सभागृहातील रसिकांचे मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूर्यकांत नामुगडे आणि विनोद अष्टुळ यांनी, तर आभार शुभांगी काळभोर यांनी मानले.

Tags: litaraturelonikalbhor
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

लोणी काळभोरः रिक्षाचालकाकडून आठवीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार; रिक्षाचालकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल
क्राईम

लोणी काळभोरः रिक्षाचालकाकडून आठवीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार; रिक्षाचालकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

August 7, 2024
Next Post
स्तुत्य उपक्रमः गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज भोरमध्ये मोफत गणवेशाचे वाटप

स्तुत्य उपक्रमः गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज भोरमध्ये मोफत गणवेशाचे वाटप

ताज्या बातम्या

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

July 8, 2026
शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

July 4, 2026
भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

July 3, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group