राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

E-Paper
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
E-Paper
  BREAKING NEWS
कामथडी पंचायत समिती गणातून मोनिका दशरथ जाधव यांच्यावर जनतेचा विश्वास; निवडणूक रिंगणात विजयाचा निर्धार 1 week ago
संयमी, प्रामाणिक नेतृत्वाला कौल; भोंगवली गणात गणेश निगडे यांना मतदारांची ठाम पसंती, परिवर्तन घडवण्याचा निर्धार 2 weeks ago
भोंगवली पंचायत समिती गणात राष्ट्रवादीच्या गणेश निगडेंचे पारडे जड 2 weeks ago
राष्ट्रवादी उमेदवारांच्या प्रचारासाठी आमदार शंकर मांडेकर मैदानात; भोंगवली–कामथडी गटात आज हाय व्होल्टेज कोपरा सभा 2 weeks ago
कार्यकुशल, निष्ठावंत व आपुलकीच्या नेतृत्वाला भोंगवली गणात उस्फूर्त प्रतिसाद; परिवर्तन अटळ 2 weeks ago
Next
Prev
Home ताज्या बातम्या

सामाजिक -डीजे च्या तालावर थिरकणा-या तरूणांना जुन्या पिढीची आर्त हाक,आमच्या टायमाला असं काही नव्हतं

by कुंदन झांजले
September 14, 2024
0
SHARES
779
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

तरुणांना पडलाय पारंपरिक खेळाचा विसर ,डिजे संस्कृती समाजासह पर्यावरणास घातकच

भोर -सध्या दहिहंडी , गणेशोत्सव पार पडला यामध्ये अनेक भागात, अनेक ठिकाणी डिजे चा अतिरेकी वापर झाला. डी जे डॉल्बीच्या तालावर बेभानपणे तरुणाई थिरकली.या डीजे डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजामुळे होणारा त्रास, धडकी भरेल असा दणदणाट,लेझर लाईटने दिपणारे डोळे , अशामुळे राहिलेले दिवस तरी सुखात जाऊ द्या,याच तरूणाईला सध्या समाजाचा विसर पडला असुन या तरुणाईला पाहून जुन्या बुजुर्ग पिढीने आमच्या टायमाला असं काही नव्हतं असा संदेश देत आपली खंत व्यक्त केली आहे.

You might also like

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

सध्या धावपळीच्या मोबाईलच्या विज्ञान युगात जुन्या चालीरीती, संस्कृती ,रुढी, परंपरा जपणारी जेष्ठ पिढी हळुहळु लोप पावत चालली आहे. ग्रामीण भागात गावच्या कट्ट्यावर,पारावर , शहरात चौकात,सलुनच्या दुकानात टोपी, पांढरा सदरा ,पायजमा,धोतर घातलेली बुजुर्ग मंडळी सध्या तरुण पिढीच्या कारणाम्यांमुळे होणा-या त्रासाला कंटाळून मोबाईल मध्ये डोकं घातलेल्या,डिजेच्या तालावर  थिरकणा-या , तोंडात मावा , गुटखा खाऊन तोंड लाल कर णा-या तरूण पिढीकडे पहात “आमच्या टायमाला असं काही नव्हतं ” असं म्हणत आता जरा तरी नीट वागा, आम्हांलाही शांत जगु द्या असा संदेश आजच्या तरूणाईला देत असल्याचे चित्र सध्या गावा गावात पहायला मिळत आहे.

मागील तीस पस्तीस वर्षा पुर्वी ज्या वेळेस ही पिढी तरुण होती वेळेस एक वेगळीच समाजपधद्ती होती,एक वेगळे संस्कारी वळण या पिढीला होते. सकाळी लवकर उठणारे, रात्री वेळेवर झोपणारे, वेळेवर पण मोजकेच पौष्टिक आहार घेणारे,पाणी वाया न घालवता झाडाला पाणी देणारे, फुलं तोडून रोज देवपूजा करणारे, मंदिरात जाऊन देव देवतांच्या पूजा करणारे, रस्त्यातून भेटणाऱ्यांची आस्थेने चौकशी करणारे, अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे घरी येणा-या पाहुण्यांचा पाहुणचार करणारे, दोन्ही हात छातीशी घेऊन नमस्कार घालणारे, अन्नधान्य वाया जाऊ न देणारे बेतानेच स्वयंपाक करणारे ,उरलं सुरल गरिबाला ,भुकलेल्याला देणारे , येणाऱ्या सणां दिवशी एकत्रित सुखदुःख कार्यात सहभागी होणारे,दांगड धिंगाणा न घालता साधेपणाने चालीरीती जपुन सण साजरे करणारे ,व्यसन करण्यासाठी लाजणारे ,मोठ्यांचा आदर बाळगणारे , जुना झालेला चष्मा तुटला तरी दोरीत वापरणारे , जुनी झालेली चप्पल फाटली तरी शिवणारे,  जुनी कपडे असली तरी नीट नेटकी वापरणारे, घरगुती पद्धतीने अन्न पदार्थ घरीच बनवणारे खिशातला पैसा जपून वापरणारे शक्यतो घरीच जेवणारे, एकत्रित कितीही मोठे कुटुंब असले तरी त्यांचा सांभाळ करणारे, गावातील भांडण तंटा गावातच मिटवणारे, राजकारण्यांपासून अलिप्त राहणारे असे समाजाविषयी आदर बाळगणारे, गावातील ढोल लेझीम खेळ एकत्रपे गावोगावी जाऊन खेळणारे,समाधानी लोक आता हळूहळू हे कमी होत चालले आहेत एकूणच येत्या दहा पंधरा वर्षांमध्ये ही पिढी जग सोडून जाणार असल्याचे कटू सत्य असलं तरी मात्र त्यांची एक शिकवण मात्र त्यांच्याबरोबर जाणार आहे. समाजात, साधे ,अर्थपूर्ण दुसऱ्यांना प्रेरणा देऊन ,समोरच्याची काळजी घेणारे, जीवन कसं जगायचं हे सांगणारे, नेतृत्व, कर्तृत्व, स्वाभिमान बाळगणारे आता हळूहळू  संपणार आहेत  त्यामुळे आत्ताच्या पिढीने या पिढीचे संस्कृती चालीरीती रुढी परंपरा जपणारे गुण अंगीकारणे गरजेचे आहे असे या पिढीकडून सांगण्यात आले आहे. 

जेष्ठ बुजुर्ग नागरिक आता वर्तमानपत्र, टीव्ही, मोबाईल पाहताना आजच्या तरुणाईचे कारणामे, तरुण पिढी कोणत्या थराला चालल्याचे दृश्ये ,वाढती गुन्हेगारी, व्यसनाधीनता,वाढता मोबाईलचा प्रभाव, समाजाचे होणारे तरुण पिढीकडून नूकसान, धार्मिक सणांना दोन समाजात चालणारी चढाओढ, जातीभेद, महिलांची असुरक्षितता, बाल लैंगिक अत्याचार,शिक्षणाकडे होणारे दुर्लक्ष,डीजे वाढता अतिरेकी वापर, पर्यावरणाचा ढासळत चाललेला समतोल हे सभोवताली बघताना तरूणाईला चांगलं रहाण्याचा संदेश देत आमच्या टायमाला असं नव्हतं हे आपसात बोलत आहेत.

Tags: Bhor
ShareTweetSend
कुंदन झांजले

कुंदन झांजले

पत्रकारिता क्षेत्रात गत ७ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह दै पुण्यनगरी मध्ये प्रतिनिधी म्हणून गत सहा वर्षांपासून काम करीत असून गेल्या तीन वर्षांपासून "राजगड न्यूज" मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
ताज्या बातम्या

Bhor – भोर वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर साष्टांग प्रणाम आंदोलन; लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे

August 13, 2025
ताज्या बातम्या

Bhor- रास्ता रोको आंदोलन !! भोरला रस्त्यांसाठी शाळकरी विद्यार्थ्यांचा एल्गार  ; भोर- कापूरव्होळ रस्त्यांची दयनीय अवस्था ; शाळेच्या विद्यार्थ्यांसह भोलावडे पंचक्रोशीतील नागरिकांचे रास्ता रोको आंदोलन

August 5, 2025
Koyata Gang भरदिवसा सरपंचाच्या पतीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; हल्ल्याचा ‘मुख्य आका’ कोण?
क्राईम

Koyata Gang भरदिवसा सरपंचाच्या पतीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; हल्ल्याचा ‘मुख्य आका’ कोण?

August 2, 2025

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

February 9, 2025
धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

September 17, 2024
राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

September 25, 2024
Breaking News: खेड-शिवापूर टोलनाक्यावर ५ कोटी रुपयांची रोख रक्कम नेणारे वाहन पोलिसांनी पकडले; पकडलेले वाहन सत्तेतील बड्या आमदाराचे? 

Breaking News: खेड-शिवापूर टोलनाक्यावर ५ कोटी रुपयांची रोख रक्कम नेणारे वाहन पोलिसांनी पकडले; पकडलेले वाहन सत्तेतील बड्या आमदाराचे? 

October 21, 2024

Bhor Newsसावधान!!हवामान खात्याचा अतिवृष्टीचा इशारा ,पुन्हा एकदा शाळांना सुट्टी जाहीर.

0

पहिल्या वेतनाच्या रकमेतून बालचमुंना दाखविला “डंका हरिनामाचा” सिनेमा

0

Bhor News सावधान||भोर तालुक्यातील वरंधा घाट माथ्यावर अतिवृष्टी,या भागातील धानवली गावातील नागरिकांचे स्थलांतर

0

Bhor Breaking News पसुरेत वीजेच्या खांबावरून घसरून वायरमन जखमी

0
कामथडी पंचायत समिती गणातून मोनिका दशरथ जाधव यांच्यावर जनतेचा विश्वास; निवडणूक रिंगणात विजयाचा निर्धार

कामथडी पंचायत समिती गणातून मोनिका दशरथ जाधव यांच्यावर जनतेचा विश्वास; निवडणूक रिंगणात विजयाचा निर्धार

February 6, 2026
संयमी, प्रामाणिक नेतृत्वाला कौल; भोंगवली गणात गणेश निगडे यांना मतदारांची ठाम पसंती, परिवर्तन घडवण्याचा निर्धार

संयमी, प्रामाणिक नेतृत्वाला कौल; भोंगवली गणात गणेश निगडे यांना मतदारांची ठाम पसंती, परिवर्तन घडवण्याचा निर्धार

February 4, 2026
भोंगवली पंचायत समिती गणात राष्ट्रवादीच्या गणेश निगडेंचे पारडे जड

भोंगवली पंचायत समिती गणात राष्ट्रवादीच्या गणेश निगडेंचे पारडे जड

February 2, 2026
राष्ट्रवादी उमेदवारांच्या प्रचारासाठी आमदार शंकर मांडेकर मैदानात; भोंगवली–कामथडी गटात आज हाय व्होल्टेज कोपरा सभा

राष्ट्रवादी उमेदवारांच्या प्रचारासाठी आमदार शंकर मांडेकर मैदानात; भोंगवली–कामथडी गटात आज हाय व्होल्टेज कोपरा सभा

February 2, 2026

Recent News

मुख्य संपादिका - वर्षा गायकवाड-सोनवणे
+91 7719020202
rajgadnews@gmail.com

URN : UDYAM-MH-26-0239825

Copyright © 2026 राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.) | Powered by राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क www.rajgadnews.live ‘राजगड न्युज’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. Copyright:  लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
About us
Privacy Policy
Grievance Redressal Policy
Fact Checking Policy

Add New Playlist

error: Content is protected !!
No Result
View All Result

Copyright © 2023 Rajgad news.live