दत्तात्रय कोंडे| राजगड न्युज लाईव्ह
खेड शिवापूर :- शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे यांची पीएमआरडीएच्या संचालक पदी निवड करण्यात आली. शिवसेना शिंदे गटाचे पहिले पुणे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे यांची पीएमआरडीएच्या संचालक पदी निवड करण्यात आली आहे. पश्चिम हवेलीच्या पट्ट्यात आजतायागत एकही पद मिळाले नव्हते, मात्र कित्येक वर्षाच्या परिश्रमाने संचालक पद मिळाल्याने शिवसैनिकांनी रमेश कोंडे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
सदर पद मिळाल्यानंतर उद्योग मंत्री उदय सामंत, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, खासदार श्रीरंग बारणे, माजी मंत्री विजय शिवतारे, शिवसेना सचिव संजय माशेलकर, संजय मोरे यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले.
माजी जिल्हा परिषद सदस्य असताना भागामध्ये विकास कामांच्या माध्यमातून अनेक कामे हाती घेऊन ती पूर्णत्वास नेली. पदाचा उपयोग विकास कामे करून भाग विकसित करण्याकडे भर दिला. त्यामुळेच मला पीएमआरडीए हे पद मिळाले असल्याचे कोंडे यांनी सांगितले.