शिरवळ: येथील केसुर्डी येथे असलेल्या थरमँक्स बँबकाँन्स विलकाँक्स कंपनीत ३ मार्च २०१५ रोजी घेण्यात आलेल्या एका कार्यक्रमात भारतीय राष्ट्रध्वजाचा अपमान प्रकरणी न्यायालयाने कंपनीच्या व्यवस्थापकासह दोघांना दोषी ठरवले आहे. या प्रकरणी प्रत्येकी ५० हजारांचा दंड न्यायालयाने ठोठावला असून, दंड न भरल्यास आठ दिवसांची साधी कैद सुनावली आहे. गणेश जाधव यांच्या तक्रारी अर्जावरुन सदर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नेमकं काय घडलं होतं?
केसुर्डी येथील थरमँक्स बँबकाँन्स विलकाँक्स कंपनीमध्ये ३ मार्च २०१५ रोजी कार्यक्रम घेण्यात आला होता. या कार्यक्रमात अमेरिकेच्या झेंड्यासहीत भारतीय राष्ट्रीय ध्वज फडकविण्यात आला. तर रेडियमने कंपनीची माहिती दर्शविणारा दिशादर्शक फलक लावून राष्ट्रीय ध्वजाचा अपमान केल्याचे निदर्शनास आले होते. याप्रकरणी खंडाळा पोलीस स्टेशनला तक्रारदार गणेश जाधव यांच्या तक्रारी अर्जावरुन कंपनीचे व्यवस्थापक मोहन शंकर पाटील (वय ७१, रा.पिंपरी, पुणे), सुहास पुंडलीक गर्दे (वय ५४, रा. कर्वेनगर, कोथरुड, पुणे) यांच्याविरुध्द राष्ट्र प्रतिष्ठा अवमान प्रतिबंध अधिनियम १९७१ चे कलम २ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.