खंडाळा : खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील बंद असलेल्या शिर्के पेपर मिलला आग लागल्याची घटना रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली. या कंपनीला गेल्या १महिन्यात आग लागण्याची ही तिसरी घटना आहे.
अनेक दिवसापासुन बंद असलेल्या शिर्के पेपर मील या कंपनी ला आज रात्री १० च्या सुमारास पुन्हा एकदा अज्ञाताने आग लावली असल्याची घटना घडली . मात्र खुप दिवसा पासून बंद असल्याने किती नुकसान झाले याचा अंदाज मात्र लावता येत नाही असे पोलिसांनी सांगितले . मात्र या महिन्यातील ही तिसरी घटना आहे आणि याच कंपनीत ही तिसऱ्या वेळी आग लावली गेली यामध्ये मिल मधील साहित्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.आग आटोक्यात आणण्यासाठी रात्री उशिरापर्यंत प्रयत्न सुरु होते.घटनास्थळी शिरवळ पोलीस, एशियन पेंट्सचे अग्निशामक दल व भोर नगर पालिका अग्निशामक दल दाखल झाले. परंतु उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कंपनीला सील आहे. त्यामुळे मिलच्या आतील भागातील आग विझविण्यासाठी जाता आले नाही. कंपनीत आग लागली असल्या कारणांनी परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट आले होते व बघ्यांची गर्दी देखील झाली होती. त्यानुसार सदर घटनेची नोंद शिरवळ पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वीच शिर्के कंपनीतील भंगार मालाला अज्ञातांनी आग लावली होती. यामुळे आजची आगही जाणूनबुजून लावण्यात आल्याचा संशय नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
१०१२ पासून कंपनी बंद
ब्राऊन पेपर टेक्नॉलॉजी शिर्के मिलला रात्री दहा वाजता आग लागली आहे. 2012 पासून ही कंपनी बंद आहे. कंपनी कामगारांमध्ये वाद आहे.