शिक्रापूर/शेरखान शेख
शिक्रापूर येथील पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर असणाऱ्या एका खाजगी बिल्डींगमध्ये चालणाऱ्या वेश्याव्यवसाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी छाप टाकून तीन इसमांसह दोन महिलांना ताब्यात घेतले असून, दोन महिलांसह राधे श्याम वाळूंज, बाळासाहेब फक्कडराव पोतले व संकेत सुभाष शितोळे या तिघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्रापूर पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर पाबळ चौकातील एका बिल्डिंगमध्ये काही इसम व महिला वेश्याव्यवसाय चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनतर सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर साळुंखे, पोलीस हवालदार विकास पाटील, उद्धव भालेराव, महिला पोलीस शिपाई उर्मिला पवार, शीतल गवळी यांच्या पथकाने सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला असता वेश्या व्यवसाय चालत असल्याचे उघड झाले आहे.
पोलिसांनी बनावट ग्राहक बनत टाकला छापा
पोलिसांचे पथक बनावट ग्राहक बनून येथील एका बिल्डींगमध्ये पाठवण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणी तपासणी केली असता एक इसम इमारतीवरून दुसऱ्या इमारतीवर उडी मारून पळून गेला. मात्र, पोलिसांनी दोघा इसमांसह दोन महिलांना त्यांच्याजवळ असलेल्या साहित्य व काही रोख रकमेसह ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर तानाजी साळुंखे रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या राधे श्याम वाळूंज (रा. पारनेर पारनेर जि. अहमदनगर), बाळासाहेब फक्कडराव पोतले (रा. जातेगाव बुद्रुक ता. शिरुर जि. पुणे) व संकेत सुभाष शितोळे (रा. न्हावी सांडस ता. हवेली जि. पुणे) यांच्या सह दोन महिलांवर गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे हे करत आहे.