नसरापूर : राजगड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या करंदी खे.बा येथील निहाल रविंद्र कुंभार, वय २५ वर्षे, रा- करंदी खेडेबारे, ता. भोर, जि.पुणे, यास हातभट्टीवाला व्यक्ती या आरोपात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र झोपडपटदी दादा, हातभटट्रीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती व वाळू तस्कर, दृकश्राव्य कलाकृतीची विना परवाना प्रदर्शन करणारे व्यक्ती (व्हिडीओ पायरेटस) जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणा-या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणे बाबतचा कायदा सन १९८१ (सुधारणा २०१५) चे कलम ३ (१) प्रमाणे निहाल रविंद्र कुंभार, वय २५ वर्षे, रा- करंदी खेडेबारे, ता. भोर, जि.पुणे ‘हातभट्टीवाला व्यक्ती या आरोपात स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांचे मार्फतिने पाठविण्यात आला होता.
त्यानुसार जिल्हाधिकारी,पुणे. त्यानी त्यांचे कार्यालयाकडील आदेश मंजुर केला कुंभार हा गेले २ वर्षापासून शोध घेवूनही मिळुन येत नव्हता. पो.नि. दिलीप पवार यांना गोपनीय माहीती दि. ०१ रोजी मिळाल्याने त्यानी सहा. फौजदार एस.यु.ढावरे, पो.हवा.अजित माने, पो.हवा. भगिरथ घुले यांना याबात आदेश करून सदर स्थानबध्द् व्यातीस ताब्यात घेवून जिल्हाधिकारी पुणे. यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे त्यास येरवडा मध्यवर्ती कारागृह पुणे येथे स्थानबद्ध करण्यात आले.
सदरची कारवाई ही अंकित गोयल, पोलीस अधीक्षक साो पुणे ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक आनंद भाईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, दिलीप पवार पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली पोसई दाजी देठे, सहा फौजदार एस.यु.ढावरे, सहा. फौजदार सतिश चव्हाण, पो. हवा. अजित माने, पो.हवा. भगिरथ घुले, पो. कॉ. पी.आर.शिंदे यांनी केली आहे