भोरः येथील भैरवनाथ तरुण मंडळाच्या वतीने गौरी गणपती सणानिमित्त खास महिलांसाठी संगीत खुर्चीच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला परिसरातील महिलांनी उस्फुर्त प्रतिसाद देत या खेळात सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेत सहभागी प्रत्येक महिलेस मंडळाच्या वतीने आकर्षक भेटवस्तू देण्यात आली, तर या खेळात विजेत्या ठरलेल्या महिलांना पैठणी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला पुणे जिल्हा परिषद सदस्या शलाका कोंडे, कुलदीप कोंडे उपस्थित होते. कार्यक्रमास महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल भैरवनाथ तरुण मंडळाच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी मंडळाचे कार्यकर्ते देखील उपस्थित होते.
पैठणी साडीचे मानकरी
प्रज्ञा पांगारे, मयुरी देवकर यांना पैठणी साडीचा मान मिळाला.