खेड शिवापूर : राजगड पोलिसांनी खेड शिवापूर येथील जुगार अड्ड्यावर छापा टाकला असून व्यंकट बाबूराव मूरमे, धर्मेंद्र त्रिभूवन प्रसाद ,विजय जयंवत जगताप शंकर भगत इतर 7 ते 8 संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,खेडशिवापूर ता हवेली जि पुणे गावचे हद्दीत गार्गी हॉटेलच्या पाठीमागील बाजूच्या असणाऱ्या पत्राशेड जवळील झाडाच्या सावली खाली जूगार मालक शंकर भगत स्वतःचे अर्थिक फायदयाकरिता जूगार व्यवसाय चालवत असून व्यंकट बाबूराव मूरमे,धर्मेंद्र त्रिभूवन प्रसाद, विजय जयंवत जगताप हे रम्मी नावाचा पत्यांचा जुगार पैशावर स्वतःचे अर्थिक फायदयाकरिता खेळत व खेळवित असतांना मिळुन आले शंकर भगत जुगार चालक व इतर 7 ते 8 व्यक्ती विरुदध
मुंबई जुगार कायद्या प्रमाणे सरकारतर्फे प्रमिला शरद निकम. राजगड पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण यांनी कायदेशीर फिर्याद दिली आहे.तर पुढील तपास पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार पो ना खेंगरे करीत आहे.